गोवंशियांची अवैध वाहतूक करू नये ! – सोलापूर पोलीस

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुणीही गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करू नये, तसेच गोवंशीय प्राण्यांचा बळी देऊ नये. अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधावा.

नागपूर येथे भागीदाराची १२.२७ लाखांची फसवणूक !

भागीदाराच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून बँकेतून ३१ धनादेशांद्वारे ९ लाख ४८ सहस्र रुपये तसेच १६ चलनांद्वारे २ लाख ७९ सहस्र ४२६ रुपये वळते केल्याप्रकरणी देवयानी लांडगे आणि त्यांचे पती नवनीत लांडगे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ठाणे येथे खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

घोडबंदर रस्त्यावरील काजूपाडा येथे दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे तोल जाऊन एस्.टी. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात करणी सेनेची मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट

‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकामध्ये हिंदु देवतेच्या वेशातील एका स्त्रीला सिगारेट ओढतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटाच्या विज्ञापनाचे भित्तीपत्रक आणि माहितीपट यांवर बंदी घालण्यात यावी.

लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदावरून खासदार भावना गवळी यांना हटवले !

भावना गवळी यांना प्रतोदपदावरून काढून त्यांच्या जागी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी इरफान शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात कारावासाची शिक्षा झाली होती !

येथील उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी इरफान शेख आणि त्याचे ३ साथीदार यांनी एका हिंदु महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने इरफान याला कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

आषाढी वारीला जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना पथकर माफी !

वारकर्‍यांनी वाहनांवर ‘स्टिकर्स’ लावण्याच्या, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस यांकडे नोंदणी करण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुढील ३ दिवस ‘रेड अलर्ट’ !

हवामान विभागाने पुढील ३ दिवस सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. त्यासाठी या चारही जिल्ह्यांत एन्.डी.आर्.एफ्.’ची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) पथके दाखल झाली आहेत.

चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात भाजपची मुंबई पोलिसांत तक्रार !

अखिलेश चौबे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या माहितीपटाचा ‘प्रोमो’ मागील ३ दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. या माहितीपटामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

दंगलीच्या गुन्ह्यात अटकेतील २४ संशयितांच्या जामिनावर १३ जुलैला सुनावणी !

शहरातील दंगलप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी अन्वेषण अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सरकारी अधिवक्त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली.