मुख्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास भेट

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ जुलैला भेट दिली. ते म्हणाले, रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होऊ शकते.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती !

४ जुलै या दिवशी रात्रभर आणि ५ जुलै या दिवशी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना २० सहस्र रुपयांचा दंड !

माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी वर्ष २००५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करतांना पोलिसांसमवेत वाद घातला होता.

अंबरनाथ रेल्वेस्थानकात बाँब ठेवल्याची माहिती देणाऱ्या दोघांना अटक !

माहिती मिळाल्यावर बाँबशोधक पथकासह ठाणे ते बदलापूर येथील १५० पोलिसांचे पथक अंबरनाथ रेल्वेस्थानकात आले. तेथे केलेल्या पडताळणीत काहीही आक्षेपार्ह असे आढळून आले नाही.

पूरस्थितीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा ! – मुख्यमंत्री

पूरस्थितीतील जिल्ह्यांतील पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यांत जाऊन पूरस्थितीची प्रत्यक्ष पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अजून खातेवाटपाचे कोणतेही धोरण ठरलेले नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना दिली.

ठाणे येथे संरक्षकभिंती कोसळल्या !

पावसामुळे ठाणे शहरात काही भागांत वृक्ष उन्मळून पडले. घोडबंदर रस्त्यावरील काजूपाडा येथे दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे तोल जाऊन एस्.टी. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या !

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी  हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

वाहतूककोंडीमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत !

मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झालेल्या वाहतूककोंडीमुळे मुंबईत सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला.

२२ वर्षे विविध मशिदींमध्ये चोरी करणाऱ्या हुसेन याला अटक

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांतील मशिदींमधून रोख रक्कम अन् मौल्यवान वस्तू चोरणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.