Murshidabad Violence : मुर्शिदाबादमधील हिंसाचारामागे बांगलादेशी आतंकवादी संघटना !

बंगालचे ‘बांगलादेश’ करण्यासाठी मुर्शिदाबादमध्ये बांगलादेशी आतंकवादी संघटना कार्यरत

मुर्शिदाबाद (बंगाल) – येथे वक्फ सुधारणा कायद्यावरून गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या हिंदुविरोधी हिंसाचाराच्या मागे बांगलादेशाचा संबंध असल्याचे समोर येत आहे. वक्फ कायद्याला विरोध करण्याच्या बहाण्याने जिहादी आतंकवाद्यांनी रचलेल्या कटाचा भाग म्हणून मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार झाल्याचे म्हटले जात आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २ हिंदूंसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामागे बांगलादेशातील जिहादी आतंकवादी संघटना ‘हिज्बुत-उत-तहरीर’ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यापूर्वी बांगलादेशी आतंकवादी संघटना ‘अन्सारुल्ला बांगला टीम’च्या आतंकवाद्यांना मुर्शिदाबादमधील धुलियान येथून अटक करण्यात आली होती. या भागात ‘अल् कायदा इन इंडियन सबकॉन्टिनंट’ आणि ‘हिजबुल मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनांच्या कारवायादेखील उघडकीस आल्या आहेत.

मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिज्बुत-उत-तहरीरचे ४० हून अधिक ‘स्लीपर सेल’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट)

हिज्बुत-उत-तहरीरचे प्रमुख कमांडर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुर्शिदाबादला आले होते. गुप्तचर संस्थांना अशीही माहिती मिळाली आहे की, हिज्बुत-उत-तहरीरचे २ संघटक गेल्या काही महिन्यांपासून मुर्शिदाबादमधील धुलियान आणि फरक्का येथे सक्रीय होते. मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिज्बुत-उत-तहरीरचे ४० हून अधिक ‘स्लीपर सेल’ असू शकतात. मुर्शिदाबादची सीमा बांगलादेशाला लागून आहे. येथून घुसखोरी आणि तस्करी होत असल्याचे सांगितले जाते. ‘हिज्बुत’ मुर्शिदाबादमध्ये तिचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

हिज्बुत-उत-तहरीरची कार्यपद्धत !

  • धर्माच्या आधारावर मुसलमान समुदायाला गोंधळात टाकणे
  • हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी मुसलमान समुदायाला सिद्ध करणे
  • स्थानिक तरुणांचा दिशाभूल करणे आणि त्यांना संघटनेत सहभागी करून घेणे

हिंदूंना ओढून नेऊन मारण्यात आले !

बांगलादेशात गेल्या वर्षी झालेल्या सत्तापालटाच्या वेळेच्या हिंसाचाराच्या वेळी या संघटनेने तेथे याच पद्धतीने काम केले. तेथे हिंदूंना घराबाहेर ओढून रस्त्यावर मारहाण करण्यात आली. त्यांची हत्या झाली. मंदिरांची तोडफोड करण्यात आली. हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्यात आली. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, ही संघटना आता भारतात वक्फ कायद्याला होणार्‍या विरोधाचा लाभ घेत भारतालाही अशांत करण्याचा कट रचत आहेत.

बांगलादेशाच्या सीमेवरील मदरशांत आतंकवादी निर्माण करून भारतात पाठवले जात आहेत !

गेल्या २ वर्षांत ‘अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनंट’ (भारतीय उपखंडातील अल् कायदा) आणि ‘अन्सारुल्ला बांगला टीम’शी संबंधित अनेक आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यांपैकी अनुमाने २० आतंकवादी बांगलादेशी आहेत. सूत्रांचा दावा आहे की, बांगलादेश सीमेजवळ अनेक तथाकथित मदरसे आहेत, जिथे धर्माच्या नावाखाली तरुणांचा बुद्धीभेद केला जात आहे. त्यांना शस्त्रे वापरण्याचे आणि स्फोटके बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षित जिहादींना बनावट भारतीय ओळखपत्रे दिली जातात आणि बंगालचे बांगलादेशामध्ये रूपांतर करण्यासाठी भारतात पाठवले जाते.