संपादकीय : इच्छाशक्ती दाखवाच !

औरंग्या जिवंत असतांना हिंदूंना सुखासुखी जगू देत नव्हता आणि मेल्यानंतरही जगू देत नाही. महाराष्ट्रात त्याच्या थडग्यातून तो अधूनमधून डोके वर काढून त्याच्या गुलामांना चिथावत असतो. काफिरांचे, म्हणजे हिंदूंचे शिर धडापासून वेगळे करणे, हिंदु महिलांचे शील भ्रष्ट करणे, मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांतील मूर्तींची तोडफोड करून त्या छिन्न-विछिन्न करणे, हे ‘अल्लाचे कार्य’ मानणारा औरंगजेब होता. त्याची हिंदूंप्रती क्रूरता आणि स्वधर्माप्रती कट्टरता किती टोकाची होती?, हे आपल्या सर्वांच्या समोर आलेच आहे. अशा औरंग्याच्या थडग्यासाठी आज मुसलमान रस्त्यावर उतरून हिंदूंशी दोन हात करतांना दिसत आहेत. या सर्वांस उत्तरदायी कोण ? तर स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतची आपलीच सर्व सरकारे ! होय, स्वातंत्र्यानंतर शत्रूच्या स्मृती पुसून टाकायच्या असतात. प्रत्येक देशाने हे केलेले आहे. आपल्या देशातील सरकारांनी मात्र त्या प्राणपणाने जतन केल्या. गुलामगिरी देशातून गेली; पण मनातून तशीच राहिली. औरंग्याच नव्हे, तर अगदी देशाच्या फाळणीस कारणीभूत असलेल्या महंमद अली जिना यांच्यासारख्या कट्टर धर्मांधांच्याही स्मृती आपण जपल्या. या सर्वांची किंमत आज देश आणि त्यातही प्रामुख्याने हिंदू पावलोपावली मोजत आहेत. ‘छावा’ चित्रपटामुळे औरंग्याचे खरे स्वरूप जनतेसमोर आल्यानंतर त्याच्याविषयीचा स्वाभाविक राग लोकांच्या मनात निर्माण झाला. स्वातंत्र्यापासून जनतेला खरा इतिहास शिकवला गेला असता, तर असा राग तेव्हाच येऊन आज चित्र वेगळे दिसले असते. या रागाला स्वार्थाचा दर्प नाही, तो देश आणि धर्म यांवरील अन्यायाचा राग आहे. त्या रागातूनच औरंग्या नावाच्या राक्षसाची कबर उखडून टाकण्याची रास्त मागणी होत आहे. काँग्रेसने केलेल्या काही कायद्यांमुळे आज ती कबर उखडणे तर सोडाच; पण ती जतन करण्याची नामुष्की विद्यमान सरकारवर ओढवली आहे. तशी खंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलूनही दाखवली. तथापि केंद्रात आणि २२ राज्यांत सरकार असतांना कोणती गोष्ट अशक्य असू शकते ?

काँग्रेसने केलेला काळा कायदा पालटायला सरकारला कितीसा वेळ लागेल ? त्यामुळे सरकारने आता अधिक वेळ न दवडता प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी आणि जो जो या देशाचा शत्रू होता, ज्यांनी ज्यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, हिंदु धर्म संपवण्यासाठी प्रयत्न केले, अशा हिरव्या आणि पांढर्‍या झग्यातील शासकांच्या काळ्या स्मृती जतन करणारे कायदे प्रथम निरस्त करावेत. याच काळ्या स्मृतींवरून जर देशात दंगली होत असतील, हिंदूंना लक्ष्य केले जात असेल आणि कायदा अन् सुव्यवस्था बिघडत असेल, तर अशा स्मृती नसलेल्याच बर्‍या ! बाकी अशा काळ्या स्मृतींचा पुळका असलेल्यांनी सरळ पाकिस्तानची वाट धरावी ! वर्ष २०१४ मध्ये पहिल्यांदा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशातील शेकडो जुने कायदे निरस्त करण्याची घोषणा केली होती. त्यात आता आक्रमकांच्या स्मृती जपण्याच्या कायद्याचाही समावेश करावा आणि हा कायदा आता भारतातून कायमचा सीमापार करावा. त्यासाठीच तर हिंदूंनी २२ राज्यांत सत्ता दिली आहे. त्यामुळे आता इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ आहे. असे केले, तरच हिंदूंच्या येणार्‍या पिढ्या सुखासुखी जगू शकतील, अन्यथा हे आधुनिक औरंग्या आणि अफझल हिंदूंचे जगणे अवघड करून ठेवतील.