दोडामार्ग – येथील धाटवाडी परिसरात हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेली सभा १९ एप्रिल या दिवशी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी उधळून लावली आणि डिचोली, गोवा येथून या सभेसाठी आलेल्या त्या महिलांना दोडामार्ग पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. या घटनेचा आम्ही निषेध करत असून येथील साटेली, भेडशी चर्च कौन्सिल ख्रिस्ती समाजाचा कोणताही संबंध नाही, असे भेडशी येथील ख्रिस्त्यांनी एकत्र येऊन घोषित केले. या वेळी मार्शल फर्नांडीस, एडवीन फर्नांडीस, शिला फर्नांडीस, मायकल लोबो, मार्शल लोबो, आमरोस फर्नांडीस आदी उपस्थित होते.