CM Devendra Fadanvis : ‘महिला दिन’ म्हणजे प्रत्येक नात्यातील स्त्रीचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस !

‘शक्तिरूपात असणाऱ्या स्त्रीशक्तीमुळेच आपले अस्तित्व’
‘विकसित भारत केवळ मातृशक्तीच्या भरोश्यावर होऊ शकतो’

मुंबई : ‘महिला दिन’ म्हणजे आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक नात्यातील स्त्रीचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ समारोप आणि कन्यारत्न सन्मान कार्यक्रमात बोलत होते. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् आणि महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले की,

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सांगितले होते की, ज्या देशांनी ओळखले की, आपल्या अर्थचक्राची ५० टक्के भागीदारी महिलांकडे आहे, तेच देश विकसित होऊ शकले. त्यामुळे जोपर्यंत महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाणार नाही, तोपर्यंत भारत विकसित बनू शकणार नाही.

२. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘लखपती दीदी’ असे उपक्रम आपण राबवले.

३. मी स्वतः मुलीचा पिता असल्याने सांगू शकतो की, मुलांपेक्षा मुली चांगल्या असतात. त्या आई-वडिलांची अधिक काळजी घेतात. त्यामुळे आता आपल्या समाजाची मानसिकता आता निश्चितपणे पालटत आहे.