वर्ष २०२४ मध्ये ४ सहस्र २४० कोटी ९० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

१५ सहस्र ८७३ गुन्हे नोंद, तर १४ सहस्र २३० आरोपींना अटक

प्रतिकात्मक चित्र

पुणे – अमली पदार्थ कायद्यांतर्गत अमली पदार्थ सेवन करणार्‍यांवर १५ सहस्र ८७३ गुन्हे नोंद, तर १४ सहस्र २३० आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ स्वत:जवळ बाळगणे, वाहतूक आणि विक्री करणार्‍यांवर २ सहस्र ७३८ गुन्हे नोंद केले असून ३ सहस्र ६२७ आरोपींना अटक केली आहे. सदर कारवायांमध्ये ४ सहस्र २४० कोटी ९० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते विधान परिषदेमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वाढ झाल्याविषयी तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देतांना त्यांनी ही माहिती दिली.

१. विटा (ता. खानापूर, जि. सांगली) येथील कार्वे औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी धाड घालून मॅफेड्रोन, इतर साहित्य, रसायन असे मिळून २९ कोटी ७३ लाख ५६ सहस्र २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

२. वाळवा तालुक्यात गांजा विक्री करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

३. मुंबई शहरात १२ परदेशी नागरिकांच्या विरोधात गुन्हा नोंद असून १३ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे आफ्रिकन नागरिकांच्या विरोधात २१ गुन्हे, बांगलादेशी १ गुन्हा नोंद असून त्यामध्ये ५६ जणांना अटक करण्यात आली आहे.