Purnia (Bihar) Muslims Blocked Hindus Road : मुसलमानांनी १५० हिंदु कुटुंबांच्या घरांकडे जाणारा मार्ग रोखला !

पूर्णिया (बिहार) येथील गावातील घटना

पूर्णिया (बिहार) – येथील शर्मा टोली गावात अनुमाने १५० हिंदु कुटुंबांच्या घरांकडे जाणारा रस्ता मुसलमान रहात असलेल्या बाजूने बंद करण्यात आला आहे. या प्रकरणी लोकांनी उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मार्ग उघडण्याची मागणी केली आहे. हिंदूंनी सांगितले की, गावाभोवती मुसलमानांची खासगी भूमी आहे, ज्यामुळे गावात दुसरा रस्ता नाही.

१. येथील अनुमाने १५० कुटुंबांच्या घरांपर्यंत पोचण्यासाठी सरकारी रस्ता नाही. गेल्या अनेक वर्षांपासून लोक खासगी रस्त्याने या परिसरात जात असत; पण आजूबाजूला मुसलमानांच्या वस्त्या असल्याने आणि भूमी मुसलमानांच्या मालकीची असल्याने त्यांनी गावाकडे जाणारा मार्ग रोखला.

२. पीडितांचे म्हणणे आहे की, त्यांनी रस्त्यासाठी भूमी मालकाला १ लाख रुपयेदेखील दिले होते; पण नंतर सामाजिक दबावामुळे भूमी मालकाने पैसे परत केले आणि रस्ताही मोकळा केला नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की, गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. यामुळे हिंदूंच्या मुला-मुलींची लग्ने होत नाहीत. कुणी आजारी पडले, तरी त्याला रुग्णालयात नेणे कठीण बनले आहे. मुसलमान आता हिदूंना पूजा करण्यापासून आणि भोंगे लावण्यापासूनही रोखत आहेत.

३. शर्मा टोला येथील लोकांनी या रस्त्याच्या मागणीविषयी उपविभागीय न्यायालयात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता; पण नंतर दिवाणी न्यायालयात हा निर्णय पालटून तो मुसलमानांच्या बाजूने देण्यात आला. आता लोकांनी जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांना अर्ज देऊन गावापर्यंत पोचण्यासाठी रस्ता देण्याची मागणी केली आहे.

४. उपविभागीय अधिकारी कुमारी तौसी म्हणाल्या की, कायद्यात असे लिहिले आहे की, जर १०० पेक्षा अधिक कुटुंबे असतील, तर त्यांचा मार्ग खासगी असला, तरीही तो रोखता येत नाही. येथे १५० हून अधिक कुटुंबे आहेत; मग त्यांना कुणी कसे रोखू शकेल ? यासाठी पोलीस ठाणे आणि विभाग अधिकारी यांना अनेक वेळा पत्रे पाठवण्यात आली; परंतु आजपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.

५. शर्मा टोला गावाचे प्रमुख सबनूर आलम म्हणाले की, काही लोक त्यांची खासगी भूमी असल्याने रस्ता देत नाहीत; परंतु दुसर्‍या बाजूने त्यांना रस्ता देण्याची चर्चा होती; पण शर्मा टोला गावाचे लोक दुसरा मार्ग स्वीकारण्यास सिद्ध नाहीत. मुसलमानांवर हिंदूंचे भोंगे आणि धार्मिक विधी रोखण्याचा आरोप चुकीचा आहे. काही लोक या घटनेचे राजकारण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारतात हिंदू बहुसंख्य असतांना एका गावात मुसलमान दादागिरी करत असतील, तर ते हिंदूंनाच लज्जास्पद ! कायद्यानुसार यावर कारवाई होणे आवश्यक आहे !
  • कुठल्या इमारतीत मुसलमानांना घरे नाकारल्यावर गळे काढणारे पुरोगामी आता मुसलमानांच्या या उन्मत्तपणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !