|
सोयगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील अफरोझ नजीर पठाण या तरुणाने इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांची अपकीर्ती करणारा आणि औरंगजेबाचे गुणगान करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला. यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘आरोपीवर जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही’, अशी ठाम भूमिका शिवभक्तांनी घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा नोंदवला.
१. या वेळी मोठ्या संख्येने हिंदु तरुणांनी आंदोलनात सहभाग घेतला.
२. बहुलखेडा येथे आरोपीच्या समर्थनार्थ काही मुसलमान तरुण पुढे आले होते.
३. आरोपी समर्थक गटातील मुसलमान तरुणांच्या हातात तलवारी आणि दांडके दिसून आले. (लोकशाहीला पायदळी तुडवून झुंडशाहीने वागणारे धर्मांध ! काहीही झाले, तरी लगेच कायदा हातात घेणार्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही, हे यातून दिसून येते. तलवारी घेऊन रस्त्यावर उतरलेल्या धर्मांधांवरही गुन्हे नोंद व्हायला हवेत ! – संपादक)
४. या वेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
५. त्यानंतर सोयगाव पोलीस ठाणे येथे पोलिसांनी जमलेल्या हिंदु तरुणांचे ऐकून न घेता गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. (गुन्हेगाराला पाठीशी घालणारे प्रशासन ! हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणांर्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते ? – संपादक)
समाजकंटक आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक ! – राजूभाऊ फुसे, आंदोलनकर्ते
आपले आदर्श छत्रपती संभाजी महाराज असून औरंगजेब हा आपला शत्रू होता. औरंगजेबाचे उदात्तीकरण कुणीही देशभक्त भारतीय सहन करू शकत नाही. त्यामुळे अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे पुन्हा समाजात तेढ निर्माण होणार नाही आणि शांतता-सुव्यवस्था राहील.
रस्त्यावर तलवारी घेऊन फिरणार्या धर्मांधांवर कारवाई नाहीच !अफरोझच्या समर्थनार्थ काही धर्मांध मुसलमान रस्त्यावर उतरले. त्यांच्यापैकी काही जणांच्या हातात दांडके, तसेच तलवारीही दिसून आल्या. त्यांच्यावर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. (रस्त्यावर तलवारी घेऊन फिरण्यास धर्मांधांना पोलीस प्रशासनाची सवलत आहे कि काय, असा प्रश्न या घटनेवरून निर्माण होतो ! – संपादक) |
संपादकीय भूमिकाराज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना आणि ज्यांच्या नावावरून जिल्ह्याचे नाव आहे, त्यांची, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची अपकीर्ती करणार्याच्या विरोधात पोलिसांकडून स्वत:हून कारवाई न होणे, हे लज्जास्पद नव्हे का ? |