
जय गिरनारी दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे यांनी सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘प्रदर्शनाची मांडणी पुष्कळ चांगली आणि वैविध्यपूर्ण आहे. प्रदर्शनातील बर्याच जणांना ठाऊक नसलेली वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला मिळाली. राष्ट्र आणि धर्म अन् हिंद़ु राष्ट्र यांविषयी दिलेली माहिती ही काळाची आवश्यकता आहे. आज आपल्याच देशात आपण परावलंबी झालो आहोत. आपण आपल्या धर्मातील पूजाअर्चा, उपासना या गोष्टी करत असतांना निधर्मीवाद्यांकडून हिंदूंचे खच्चीकरण केले जाते. आपण कधी कुणावरही अन्याय केलेला नाही; मात्र आपण संघटित न राहिल्याने इतरांनी हिंदूंवर अन्याय केला आहे. निधर्मीवाद्यांमुळे हिंदूंना पारतंत्र्य भोगावे लागले. आतातरी यातून बोध घेऊन हिंदूंनी एकजूट झाले पाहिजे. हिंदूंनी आपल्यातील भेदभाव दूर केले पाहिजेत. एकजूट होऊन हिंदूंनी कार्य केल्यास आपले स्वप्न साकार झाल्याखेरीज रहाणार नाही. ही काळाची आवश्यकता आहे. संपूर्ण विश्वात भारताखेरीज अन्य द़ुसरे राष्ट्र नाही. आपल्याला नको असतांना ‘सेक्युलॅरिझम्’चा सामना करावा लागला आहे; मात्र आपले खरोखर हिंदु राष्ट्र आहे आणि ते जतन केले पाहिजे. यासाठी दत्तप्रभूंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. मनापासून आपण सर्वांनी एकजूट होऊन कार्य करून स्वप्न साकार करूया.’’