‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी आजपर्यंत या खडतर जीवनात साधनारत राहिलो’, ही जाणीव माझ्या मनात जागृत झाली. त्या वेळी गुरुदेवांना आळवण्याचा प्रयत्न केला असता ही शब्दसुमने मनःपटलावर उमटली. ही शब्दसुमने गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.

देवा, तुजवीण आमचे सारे जीवन व्यर्थ आहे रे ।
गुरुदेवा, स्थुलातून तुम्ही लळा लावला मजला ।
तुम्ही सच्चिदानंद होऊन आता सूक्ष्मतम झाला ।। १ ।।
घोर कलियुगात तुम्ही लुळ्या-पांगळ्यांना सोबत घेतले ।
स्वप्न हिंदु राष्ट्राचे देऊन आम्हास कार्यप्रवण केले ।। २ ।।

देवा (टीप), तू आहेस; म्हणूनी साधनेची संधी मज लाभली ।
तुझ्या छत्रछायेखाली श्वास घेण्याची संधी मज मिळाली ।। ३ ।।
देवा, तू जी शिकवण आणि निर्मळ प्रेम आम्हाला दिलेस ।
या अवनीवरी ही प्रीतीमय शिकवण अन्य कोणी नाही दिली ।। ४ ।।
देवा, तुजवीण आमचे सारे जीवन व्यर्थ आहे रे ।
यापुढे ‘तू जिथे, तिथे आम्ही’ असे रूढ होऊ दे रे ।। ५ ।।
टीप : परात्पर गुरु डॉ. आठवले
– श्री. अविनाश जाधव (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|