
१. भविष्यात घडणार्या घटनेविषयी आधीच जाणून महर्षींनी करायला सांगितलेला उपाय
‘एकदा महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून अकस्मात् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रहात असलेल्या कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील सेवाकेंद्राच्या भोवती गेरू मातीचे मंडल घालायला सांगितले आणि त्या सेवाकेंद्राच्या मुख्य दारावर मध्यभागी अननस बांधून ठेवायला सांगितला. त्यांनी ‘असे करायला का सांगितले ?’, याविषयी आम्हाला समजले नाही.
२. कांचीपूरम् सेवाकेंद्राच्या समोरच्या रस्त्यावर काळ्या दोरीने गुंडाळल्यासारखी एक वस्तू आढळणे
महर्षींनी सांगितल्यानुसार आम्ही दोन्ही उपाय केले. दुसर्या दिवशी आम्ही सर्व जण सेवेसाठी सेवाकेंद्राच्या बाहेर पडलो. त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे) यांना कांचीपूरम् सेवाकेंद्राच्या समोरच्या रस्त्यावर काळ्या दोरीने गुंडाळल्यासारखी एक वस्तू दिसली. आम्हाला त्या वस्तूकडे पाहून चांगले वाटत नव्हते. खरेतर कांचीपूरम् सेवाकेंद्र शेवटच्या गल्लीत असल्यामुळे इकडे सहजासहजी कुणी येत नाही. ‘ती वस्तू इकडे कशी आली ?’, हे आमच्या लक्षात आले नाही.
३. महर्षींनी आश्वस्त करणे
नंतर आम्ही महर्षींना (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना) भ्रमणभाष करून विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘हा करणीचा प्रकार आहे; पण आपण आधीच उपाय केल्याने करणीचा काही परिणाम होणार नाही. काळजी करण्याचे कारण नाही. ती वस्तू विसर्जित करा.’
‘महर्षि त्रिकालदर्शी आहेत’, हे लक्षात आले. त्यांनी आधीच उपाय सांगितल्यामुळे आम्हाला कुणालाही काही त्रास झाला नाही. ’
– श्री. विनीत देसाई, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (१३.१२.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |