Deputy Foreign Minister Leaves Afghanistan : मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याच्या तालिबान सरकार निर्णयावर टीका करणार्‍या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणिस्तान सोडला !

तालिबान सरकारमधील उपपरराष्ट्रमंत्री शेर महंमद अब्बास स्तानिकझाई

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याच्या तालिबान सरकारच्या निर्णयावर टीका करणारे सरकारमधील उपपरराष्ट्रमंत्री शेर महंमद अब्बास स्तानिकझाई यांना देश सोडण्यास भाग पाडण्यात आले आहे. ते अफगाणिस्तान सोडून संयुक्त अरब अमिरात देशात गेले आहेत. तालिबानने अफगाणी मुलींना माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. तसेच गेल्या महिन्यात तालिबानने महिलांसाठी परिचारिकेचे प्रशिक्षण घेण्यावरही बंदी घातली होती.

२० जानेवारीला एका पदवीदान समारंभात स्तानिकझाई म्हणाले होते की, महंमद पैगंबर यांच्या काळातही शिक्षणाचे मार्ग पुरुष आणि महिला यांंसाठी मोकळे होते. अशा काही उल्लेखनीय महिला होत्या की, जर मी त्यांच्या योगदानाची सविस्तर माहिती दिली, तर मला खूप वेळ लागेल. आपण २ कोटी लोकांवर अन्याय करत आहोत.

संपादकीय भूमिका

तालिबानमध्येही महिलांविषयी आत्मियता बाळगणारी कुणीतरी अशी व्यक्ती आहे, हेही नसे थोडके !