महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणू ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

हिंदु राष्ट्रात हिंदूंचे हित पाहिले जाणार असल्याचे आश्वासन !

नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

चंद्रपूर – आम्ही धर्मांतर खपवून घेणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणू. बांगलादेशी आणि रोहिंग्या यांचा शोध घेऊन त्यांना परत पाठवू. हिरवा रंग धारण करणार्‍या सापाची वळवळ थांबवावी. गोवंशियांच्या होणार्‍या हत्या थांबवा, अशी चेतावणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. येथे आयोजित हिंदु धर्मसभेत ते बोलत होते. या वेळी मुरलीधर महाराजही उपस्थित होते. ‘तिरंगा झेंडा मंत्रालयात फडकत आहे; मात्र त्यापेक्षाही मोठा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकत आहे, हे लक्षात ठेवा. मी मंत्री म्हणून नाही, तर हिंदु म्हणून तुमच्याशी संवाद साधत आहे’, असे त्यांनी सांगितले.

नितेश राणे म्हणाले…

१. राज्यात सर्वत्र हिरव्या सापांची वळवळ चालू आहे. ‘लव्ह जिहाद’द्वारे मुलींची फसवणूक होत आहे. हे वेळीच न थांबल्यास प्रत्येकाला आतमध्ये टाकू. चंद्रपूर जिल्ह्यात लव्ह जिहादची एकूण २२ प्रकरणे आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान आमच्या हिंदु बहिणीकडे वाकड्या दृष्टीने पहात असेल, तर माझ्याकडे या. त्यांची नावे द्या. त्यांचा तिथेच बंदोबस्त आणि कार्यक्रम करू.

२. आम्ही सर्व हिंदु विचाराचे लोक आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कडवट हिंदु मुख्यमंत्री म्हणून सरकारचे नेतृत्व करत आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारमध्ये आहेत.

३. हिंदु समाजाच्या विरोधात भूमिका घेतली, तर तुम्हाला जागा दाखवू. तेव्हा तुमचा पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा काही करू शकणार नाही.

४. हिंदु समाजातील मुलीचे आयुष्य जिहादी उद्ध्वस्त करत आहेत. हिंदु समाजाकडे वाकड्या दृष्टीने बघणार्‍यांना येथे स्थान नाही.

५. हिंदु राष्ट्रात पहिले हिंदूंचे हित पाहिले आणि जोपासले जाईल.

६. वणी, पांढरकवडा येथे मोठ्या प्रमाणात गोहत्या चालू आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याची १०० टक्के कार्यवाही झालीच पाहिजे, ही स्पष्ट भूमिका आहे. येथे शरिया कायदा लागू नाही. तो पाकिस्तानमध्ये लागू आहे. गायींच्या कत्तली खपवून घेणार नाही. गाय ही आपली आई आहे.

७. हिरवे साप राज्यपालांपेक्षा मोठे झाले आहेत का ? हिंदु धर्माकडे वाकड्या नजरेने बघत असाल, तर खैर नाही. गोहत्येच्या नावाने मस्ती चालू आहे, ती बंद करा.

८. राज्यात सरकार आणण्यासाठी हिंदु पाठीशी राहिला. त्यामुळे हिंदु समाजासाठी काम करणार आहे. रोहिंग्यांना राज्याच्या बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.