बस्तर (छत्तीसगड) – येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार झाले, तर एक सैनिकाला वीरमरण आले. तसेच ३ सैनिक घायाळ झाले. या नक्षलवाद्यांकडून अत्याधुनिक रायफली जप्त करण्यात आल्या. छत्तीसगडमधील नारायणपूर-दांतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दक्षिण अबुजमार जंगलामध्ये ही चकमक उडाली. यामध्ये सैनिक सान्नू कराम यांना वीरमरण आले’, अशी माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिली. ‘सैनिकांचे विशेष कृती दल, तसेच नारायणपूर, दांतेवाडा, जगदलपूर आणि कोंडगाव जिल्ह्यांतील जिल्हा राखीव दलाचे पोलीस यांच्या सुंक्त विद्यमाने ही नक्षलवादविरोधी मोहीम राबवण्यात आली होती’, अशी माहिती पी. सुंदरराज यांनी दिली.