हिंदूंवर होणार्या अत्याचारांचे सूत्र उपस्थित करणार
नवी देहली – बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालू असतांनाच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री ९ डिसेंबर या दिवशी बांगलादेशाच्या दौर्यावर जाणार आहेत. ५ ऑगस्टला शेख हसीना सरकार उलथवून टाकल्यानंतर भारतातील एका वरिष्ठ मुत्सद्दीने बांगलादेशाचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, ‘‘दोन्ही पक्षांमध्ये अलीकडील घटनांवर चर्चा होईल.’’ बांगलादेशाची हिंदु संस्था ‘सनातनी जागरण ज्योत’चे प्रवक्ते चिन्मय प्रभु यांच्या अटकेविषयी जैस्वाल म्हणाले, ‘‘बांगलादेश न्यायिक अधिकारांचे रक्षण करेल, अशी आशा आहे.’’ ३ डिसेंबर या दिवशी उच्च न्यायालयात चिन्मय प्रभु यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीच्या वेळी प्रभु यांची एकाही अधिवक्त्याने बाजू मांडली नव्हती.
ढाक्याला एअर इंडियाचे विमान नाही !बांगलादेशातील हिंसाचारामुळे सध्या कोलकाता ते ढाका थेट विमानसेवा चालू होणार नसल्याचे ‘एअर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. |