Darbhanga Stone Pelting : दरभंगा (बिहार) येथे मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून रामविवाह मिरवणुकीवर दगडफेक

काही जण घायाळ

दरभंगा (बिहार) – येथील तरौनी गावातून शुक्रवार, ६ डिसेंबर या दिवशी काढण्यात आलेल्या रामविवाहाच्या मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनेक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच रामविवाहाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुसलमानांनी आधी मिरवणुक थांबवली आणि नंतर त्यांना लाठीमार करायला चालू केले. यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक चालू झाली.

घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी परिसरात तळ ठोकून आहेत.

उपविभागीय अधिकारी विकास कुमार म्हणाले की, दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणात आहे; पण हिंसाचार का झाला ? दगडफेक करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणारे हे कोण आहेत ? याची चौकशी करण्यात येत आहे.

रामविवाह मिरवणूक काय आहे ?

मार्गदशीर्ष पंचमी या दिवशी श्रीराम आणि सीतामाता यांचा विवाह झाला. उत्तर भारतात बर्‍याच ठिकाणी या दिवशी मंदिरांमध्ये श्रीराम आणि सीतामाता यांच्या मूर्तींना सजवून त्यांचा विवाह सोहळा आयोजित केला जातो. त्या वेळी मिरवणूक काढली जाते. त्याला रामविवाह मिरवणूक म्हटले जाते.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका म्हणजे धर्मांध मुसलमानांसाठी आक्रमणाचे ठिकाण असेच आता म्हणावे लागेल ! काश्मीरमधील दगडफेक थांबली; मात्र हिंदूंंच्या मिरवणुकांवर होणारी दगडफेक अद्याप थांबत नाही, हे सर्वपक्षियांना लज्जास्पद !