इतरांचा विचार करणारी आणि शिकण्‍याची वृत्ती असलेली ५० टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची नेरूळ, नवी मुंबई येथील कु. ऋत्‍वि मिलिंद देसाई (वय ११ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. ऋत्‍वि देसाई ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्‍ये कु. ऋत्‍वि मिलिंद देसाई हिची आध्‍यात्मिक पातळी ५० टक्‍के आहे.’  संकलक)

कु. ऋत्‍वि मिलिंद देसाई


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही,  उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. घरकामात साहाय्‍य करणे

‘कु. ऋत्‍वि मला स्‍वयंपाकघरात साहाय्‍य करते. ती काही पदार्थ बनवते. ती भांडी घासते. ती दूध तापवते. ती शीतकपाटात पदार्थ ठेवते.

 २. प्रेमभाव

सौ. ममता मिलिंद देसाई

ऋत्‍विच्‍या आजीला कधी बरे वाटत नसल्‍यास ऋत्‍वि आजीचे डोके आणि पाय दाबून देते. आजीला काही हवे असल्‍यास ते ऋत्‍वि आजीला देते. आम्‍ही बाहेर गेल्‍यावर ऋत्‍वि आजीचा हात धरून चालते. ऋत्‍वि आमच्‍या वसाहतीतील रखवालदाराच्‍या २ लहान मुलींना चांगल्‍या प्रकारे सांभाळते.

३. सेवेची आवड

तिला ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करायला आवडते. तिने मला महाशिवरात्री निमित्तच्‍या ग्रंथप्रदर्शन सेवेत पुष्‍कळ साहाय्‍य केले. एकदा मी तिला माझ्‍या समवेत सेवेला घेऊन गेले नाही. तेव्‍हा तिला पुष्‍कळ वाईट वाटले.

४. नवीन गोष्‍टी शिकण्‍याची आवड

एकदा मी बिंदूदाबनाची सेवा शिकायला गेले होते. तेव्‍हा ती माझ्‍या समवेत आली होती. तिने बिंदूदाबन करण्‍याचे शिकून घेतले. एकदा मला त्रास होत होता. तेव्‍हा ऋत्‍विने माझ्‍यावर चांगल्‍या प्रकारे बिंदूदाबन केले.

५. इतरांचा विचार करणे

ती तिच्‍याकडे असलेला खाऊ प्रथम घरातील सर्वांना देते. तिच्‍या शाळेत जाण्‍याच्‍या वेळी मला काही वेळा तिची सिद्धता करून द्यायला उशीर होत असल्‍यास ती जेवण वाढून घेते. ती शाळेत न्‍यायचा खाऊचा डबा सिद्ध करते. ती तिचे केस व्‍यवस्‍थित करते.’

६. स्‍वभावदोष

अव्‍यवस्‍थितपणा, हट्टीपणा आणि भावशीलता.’

– सौ. ममता मिलिंद देसाई (कु. ऋत्‍विची आई), नेरूळ, नवी मुंबई. (२३.४.२०२४)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक