उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. शर्वरी सणस ही या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. शर्वरी विकास सणस हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे.’ – संकलक)
‘मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया (३.१२.२०२४) या दिवशी कु. शर्वरी विकास सणस हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. शर्वरी विकास सणस हिला तिच्या १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जिज्ञासू वृत्ती : ‘कु. शर्वरी सतत प्रश्न विचारत असते. तिला काही समजले नाही किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ समजला नाही, तर लगेच ती तो अर्थ विचारून घेते. तिला सगळे जाणून घ्यायचे असते.
२. प्रेमभाव : शर्वरीला मुक्या प्राण्यांविषयी प्रेम वाटते. ‘त्यांना भूक लागली असेल’, असे वाटून तिला मार्गात दिसणार्या कुत्र्यांना खाऊ द्यायचा असतो. ‘प्राण्यांना प्राणी संग्रहालयात ठेवतात. त्यांना त्यांच्या कुटुंबासह वनात ठेवायला हवे. प्राण्यांना प्राणी संग्रहालयात कोंडून त्यांचे पाय बांधून ठेवल्याने त्यांना किती त्रास होत असेल’, असे तिला वाटते.
३. देशाभिमान : तिला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट फार आवडला. ती तो चित्रपट पहातांना बरेच प्रश्न विचारत होती. तिने सांगितले, ‘‘भारताचा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा नीट समजावा’, यासाठी मी आणखी एकदा दूरचित्रवाणीवरील वाहिनीवर हा चित्रपट पहाणार आहे.’’
४. धर्माभिमान : तिला ‘आपण हिंदु धर्मात जन्माला आलो’, यासाठी पुष्कळ भाग्यवान आहोत’, असे वाटते.
५. देवाप्रती भाव : तिच्यात देवाप्रती भाव जाणवतो. ती सणांच्या दिवशी सर्व सिद्धता भावपूर्ण करते. तेव्हा ती सर्व कृती नामजप करत करते. ती प्रवासात नामजप करते. तिचा ‘नामजप केल्यावर देव आपल्या समवेत असतो. त्यामुळे अनिष्ट शक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही’, असा ठाम विश्वास आहे. ती देवाला सगळे सांगते. तिला काही साहाय्य लागले किंवा तिला काही येत नसेल, तर ती देवाची क्षमा मागून त्याच्याकडे साहाय्य मागते.
हे गुरुदेवा, ‘आपण मला दैवी बालकरूपी कळी फुलवण्याची आणि त्यांचे संगोपन करण्याची सेवा दिली’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘आपण माझ्याकडून आपल्याला अपेक्षित अशी सेवा करून घ्या’, ही आपल्या चरणी अत्यंत भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– सौ. ऋतुजा विकास सणस (कु. शर्वरीची आई), मुंबई (१०.४.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |