केलेल्या अन् न केलेल्या कामाचेही श्रेय स्वतःकडेच ओढून घेण्याची माणसाची प्रवृत्ती असते. खरच ज्याची स्तुती करावी, असे सद़्गुण माणसाजवळ किती असतात ? ईश्वर मात्र सर्व सद़्गुणांचा सागर आहे. म्हणून वेद, शास्त्र, पुराणे आणि संत-महात्मे यांनी वारंवार गुणगान केले, ते एका ईश्वराचेच !
ईश्वराची स्तुती करणे, हेच श्रेयस्कर !
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)