चर्चमधील गैरवर्तनाचे प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका !
लंडन – कँटरबरीचे आर्चबिशप तथा चर्च ऑफ इंग्लंडचे प्रमुख जस्टिन वेल्बी यांनी चर्चमधील गैरवर्तन प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यागपत्र दिले आहे. काही दशकांपूर्वी चर्चमधील ख्रिस्ती उन्हाळी शिबिरांमध्ये एका चर्च स्वयंसेवकाने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांची योग्य चौकशी करण्यात ते अपयशी ठरले होते. याविषयी स्वतंत्र अहवाल नुकताच प्रकाशित झाला. यामध्ये जगभरातील ८५ दशलक्ष अँग्लिकन लोकांचे आध्यात्मिक नेते वेल्बी हे चर्चमध्ये गैरवर्तणूक करणार्या व्यक्तीला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. या अहवालात १९७० च्या दशकातील गैरवर्तनाचे आरोप अयोग्यरित्या हाताळल्याविषयी त्यांच्यावर टीका टीका करण्यात आली होती.
Read more:https://t.co/XAe2chTE6h
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 14, 2024
१. वेल्बी यांनी त्यांच्या त्यागपत्रात म्हटले आहे की, मला आशा आहे की, त्यागपत्र देण्याचा निर्णय स्पष्ट करेल की, चर्च ऑफ इंग्लंड पालटाची (बदलाची) आवश्यकता किती गांभीर्याने जाणते ? आणि सुरक्षित चर्च सिद्ध करण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते. मी पद सोडत असतांना सर्व अत्याचारपीडित लोकांच्या दु:खात सहभागी असल्याचे मला सांगावेसे वाटते.
२. या अहवालात असे म्हटले आहे की, जॉन स्मिथ या चर्चच्या ब्रिटीश स्वयंसेवकाने ४० वर्षांमध्ये १०० हून अधिक मुले आणि तरुण यांच्यावर ‘पाशवी अन् भयानक’ शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केले. २०१८ मध्ये स्मिथ यांचा मृत्यू झाला.
३. स्मिथ हे इव्हर्न ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांनी इंग्लंडमधील ख्रिस्ती शिबिरांना निधी पुरवला होता. बिशपपदी नियुक्ती होण्यापूर्वी वेल्बी यांनी त्यांच्याकडे ‘डॉर्मिटरी ऑफिसर’ म्हणून काम केले होते.