२ हिंदु भावांना मारहाण !
डोंबिवली (ठाणे) – येथील ९० फुटी रस्त्यावरील कचोरे येथे रात्री १०.३० वाजता धर्मांधांनी दुचाकीस्वार हिंदूच्या अंगावर पेटता सुतळी बाँब फेकला. या बाँबमुळे दुचाकी बंद पडली. ‘किमान बघून फटाके फोडा’, असे हिंदूने सांगताच धर्मांधांनी त्याला मारहाण केली, तर त्याच्या भावाला लोखंडी गजाने मारले. या प्रकरणी ओमकार केशव पवार (वय १८ वर्षे) यांनी तक्रार दिली आहे. गणेश पवार हे त्यांचे बंधू आहेत. मोगीस खान (वय २४ वर्षे) आणि वसीम पटेल (वय २४ वर्षे) अशी आक्रमणकर्त्यांची नावे आहेत. त्यांनी पवार यांना शिवीगाळ केली, तसेच मारहाणही केली. मारहाण करणार्यांमध्ये इस्माईल खान, आयुब खान, युसुफ खान आणि युनुस खान यांचाही समावेश आहे.
Dombivli (Thane): Fanatics throw a firecracker bomb on a Hindu!
2 Hindu brothers beaten up!
If the Hindus of Hindu-majority Dombivli had organised themselves against this incident and reprimanded the bigots in time, they would never have dared to do such an act again!
The… pic.twitter.com/yhk1FGOAQs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 5, 2024
१. ‘दोन भावांना वाचवण्यासाठी कुणी पुढे आल्यास त्यांना संपवू’, अशी धमकीही खान आणि पटेल यांनी दिली. (अशांवर पोलीस कधी जरब बसवणार ? – संपादक) त्यामुळे त्यांच्या दहशतीने परिसरातील नागरिक घाबरले. तेथे पळापळ चालू झाली. व्यापार्यांनी दुकाने बंद केली. (असे नेभळट हिंदू काय कामाचे ? – संपादक)
२. ओमकार पवार यांचे परिचित तेथे आल्याने त्यांनी जमावाच्या कह्यातून ओमकार यांची सुटका केली. गणेश यांच्यावर लोखंडी सळईने आक्रमण झाल्याने त्यांना कळवा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
३. मोगीस खान याने ‘हिंदूंनी हातात दांडके घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. तसेच आमच्यासह आमच्या कुटुंबियांना मारहाण करून दुखापत केली’, अशी विरुद्ध तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. (‘चोर तो चोर वर शिरजोर’, या वृत्तीचे धर्मांध ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|