US Vice President’s India Visit : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हॅन्स त्यांच्या पत्नीसह जयपूर दौर्‍यावर येणार

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हॅन्स व त्यांच्या पत्नी उषा चिलुकुरी

जयपूर (राजस्थान) – अमेरिकेचे उपाध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हॅन्स हे २१ एप्रिलला जयपूरच्या भेटीवर येणार आहेत. ते जयपूरमध्ये ३ दिवस रहातील. या कालावधीत ते आगरा येथे ताजमहाल पहाण्यासाठीही जातील.

व्हॅन्स यांच्यासमवेत त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा चिलुकुरी याही असणार आहेत. ते जयपूरमधील आमेर पॅलेस आणि जंतरमंतर यांसारख्या वारसा स्थळांनाही भेट देतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्हॅन्स यांच्यासमवेत जयपूरला येऊ शकतात.