जम्मू-काश्मीर आणि देहली येथेही जाणवले धक्के
नवी देहली – अफगाणिस्तानमध्ये १९ एप्रिलला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भूंकप झाला. याची तीव्रता रिक्टर स्केलवर ५.८ इतकी होती. याचे धक्के जम्मू-काश्मीरसह देहलीमध्येही जाणवले. अद्याप या भूकंपामध्ये जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात होता. हा भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. या भागात भूकंप होणे सामान्य आहे.