योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
‘घर कितीही स्वच्छ असले, तरी त्याची नियमित झाडलोट करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मनाचे पावित्र्य टिकवण्यासाठी प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे. स्वच्छ, पवित्र आणि प्रामाणिक मनुष्याला परमेश्वर साहाय्य करतो; म्हणून आपले हृदय, तसेच मन बालकाप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे. मनाची एकाग्रता प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते.’ (ऑगस्ट २००२)