श्रेष्ठ स्नान

ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

मनाचे मळ धुवून टाकणे, यालाच श्रेष्ठ स्नान म्हटले आहे. काम,  क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे रजो-तमोगुणांतून उत्पन्न होणारे जे दोष त्यांनाच आपल्या शास्त्रांत मनाचे दोष म्हटले आहे. या दोषामुळे मलीन झालेले मन अस्वास्थ्याने पीडिले जाते, दुःखी होते, माणसाचे जीवन कष्टी करते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘यशप्रश्न’)