
‘मुलाने रडले पाहिजे. आईला पुकारले पाहिजे आणि हेही जाणले पाहिजे की, रडण्यामुळे आई येईलच, असे नाही. भक्त टाहो फोडतो, पुकारतो, रडतो भगवंताकरता. भगवंत येईलच, असा भरवसा नाही. त्याच्या मनी जर समग्र समर्पण असेल, संपूर्ण शरणागती असेल, पूर्ण श्रद्धा असेल, तर समस्त प्राणांनी पुकारले, तर भगवंत त्याच क्षणी धावतो.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : साप्ताहिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२४)