प्रत्येक कर्माच्या फळामध्ये चांगले आणि वाईट या दोहोंचे मिश्रण असते. कोणत्याही सत्कर्मात वाईटाचा थोडा ना थोडा अंश असतोच. जिथे अग्नी तिथे धूर, तसेच कर्माला सर्वदा काही ना काही वाईट चिकटलेले असायचेच. ज्यामध्ये चांगल्याचा अधिकाधिक आणि वाईटाचा अगदी न्यूनतम अंश असेल, अशीच कर्मे आपण नेहमी करावीत. – स्वामी विवेकानंद