कॅनडाच्या संसदेत भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांचे विधान !
ओटावा (कॅनडा) – बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती यांसह अन्य अल्पसंख्यांकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत आहेत. खरे तर बांगलादेश जेव्हा अस्थिर होतो, तेव्हा तेव्हा तेथील हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती यांच्यावरील आक्रमणे वाढतात, असे विधान कॅनडाच्या संसदेत भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी केले. ‘वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्यापासून तेथील अल्पसंख्यांकांची संख्या अल्प झाली’, असेही ते म्हणाले.
चंद्रा आर्य पुढे म्हणाले की, या परिस्थितीकडे कॅनडा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही २३ सप्टेंबर या दिवशी संसदेसमोर निर्देशने करणार आहोत. या आंदोलनात कॅनडातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील.
संपादकीय भूमिका‘आता बांगलादेशाला अस्थिर करण्यामागे अमेरिका आहे’, हे चंद्रा आर्य बोलतील का ? हिंदूंवरील या आक्रमणांसाठी अमेरिकाच उत्तरदायी आहे, असे चंद्रा आर्य यांनी सांगायला हवे ! |