Manipur Violence : मणीपूरमध्‍ये पुन्‍हा हिंसाचार : ६ जणांचा मृत्‍यू

इंफाळ – गेल्‍या सव्‍वा वर्षाहून अधिक काळ धुमसत असलेल्‍या मणीपूरमधील  हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. आसाम सीमेला लागून असलेल्‍या जिरिबाम जिल्‍ह्यातील हिंसाचारात ७ सप्‍टेंबरला ६ जणांचा मृत्‍यू झाला. मणीपूरमधीलच इंफाळ खोर्‍यातील बिष्‍णूपूर येथे ६ सप्‍टेंबरला झालेल्‍या रॉकेट आणि ड्रोन आक्रमणांना प्रत्‍युत्तर म्‍हणून जिरिबाम येथील आक्रमण करण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात आले. मणीपूर राज्‍यात मागील ७ दिवसांत हिंसाचार वाढला आहे. यामध्‍ये ८ जणांचा मृत्‍यू झाला असून १५ हून अधिक जण घायाळ झाले आहेत.

बिष्‍णूपूर येथील आक्रमणात एका पुजार्‍याचा मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर जिरिबाम येथील एका खेड्यावर आक्रमण करण्‍यात आले. त्‍यानंतर तेथील २ गट समोरासमोर आले. या घटनेंतर मुख्‍यमंत्री बीरेनसिंह यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावून राज्‍यपालांना राज्‍यातील स्‍थितीविषयी सविस्‍तर माहिती दिली.

संपादकीय भूमिका

मणीपूरमध्‍ये जोपर्यंत ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही !