‘आपण गुरूंना शरण गेल्यास ते आपला हात कधीही सोडत नाहीत. ते आपल्याकडून साधना करून घेतात. दुर्ग, छत्तीसगड येथील साधक श्री. बबन अडणेकर यांच्या संदर्भात असेच घडले. त्यांनी वर्ष २००४ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. सनातनवरील आक्षेपाच्या काळात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा त्यांना तीव्र विरोध असूनही त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा न्यून झाली नाही. वर्ष २०१५ मध्ये ते नोकरीनिमित्त उत्तर आफ्रिकेतील लिबिया येथे गेले. काही मासांपूर्वी ते साधकांच्या संपर्कात आले आणि त्यांनी पुन्हा साधनेचे प्रयत्न करण्यास आरंभ केला. त्या वेळी मला त्यांच्याकडून पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. साधनेची सूत्रे त्वरित कृतीत आणणे आणि प्रत्येक सत्संगाला उपस्थित रहाण्याची ओढ वाटणे : ‘श्री. बबनदादांना साधनेविषयी काही सूत्रे सांगितल्यास त्यानुसार ते तत्परतेने कृती करतात. एकदा त्यांनी मला सांगितले, ‘‘आता माझ्या लक्षात येत आहे, ‘या काही वर्षांत मी सनातनपासून दूर गेल्यामुळे पुष्कळ काही गमावले आहे.’ एखाद्या लहान मुलाला पुष्कळ भूक लागल्यावर तो जे मिळेल, ते सर्व अधाशासारखे खातो, तशीच आता माझी अवस्था झाली आहे. आता मला प्रत्येक सत्संगाला उपस्थित रहाण्याची ओढ वाटते.’’
२. लिबिया येथे रहात असूनही भारतीय संस्कृतीनुसार आचरण करणे आणि स्थानिक लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्यावर त्यांना निर्भीडपणे उत्तर दिल्याने त्यांनी आक्षेप घेण्याचे बंद करणे : लिबिया येथे रहात असूनही ते भारतीय संस्कृतीनुसार आचरण करतात. ते टिळा लावत असल्याने तेथील स्थानिक लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. यावर आस्थापनातील सदस्यांच्या झालेल्या बैठकीत बबनदादांनी परखडपणे सांगितले, ‘‘अन्य पंथीय त्यांच्या पंथानुसार आचरण करतात, तर मी माझा धर्म का सोडू ? तुम्हाला हे मान्य नसेल, तर माझे भारतात जाण्याचे तिकिट काढा.’’ तेव्हा आस्थापनातील अधिकार्यांनी ‘सर्व जण आपापल्या धर्मानुसार आचरण करू शकतात’, असा नियम केला. त्यानंतर स्थानिक लोकांनी आक्षेप घेण्याचे बंद केले.
३. एका सत्संगाला जोडायला उशीर झाल्यावर स्वभावदोषांची सारणी लिहिण्याची पद्धत उत्तरदायी साधकाला विचारून प्रतिदिन चिंतन सारणीनुसार व्यष्टी साधनेचे प्रयत्न करायला आरंभ करणे : एकदा सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग होता. बबनदादांकडून त्याची वेळ नोंद करण्यात चूक झाली. त्यामुळे त्यांना सत्संगाला जोडायला उशीर झाला. त्यांना ‘मी तेवढा वेळ सत्संगापासून वंचित राहिलो’, असे वाटून या चुकीबद्दल पुष्कळ पश्चात्ताप झाला. त्या दिवशी ते कार्यालयात गेल्यावर त्यांच्या मनात ‘व्यष्टी साधना करणे आणि चुका लिहिणे आवश्यक आहे’, असे विचार येऊ लागले. त्यांनी कार्यालयातच चिंतन सारणी आणि स्वभावदोषांची सूची अन् अहंचे पैलू यांची छापील प्रत काढली. त्यांनी कार्यालयातूनच उत्तरदायी साधकाला संपर्क करून स्वभावदोष सारणी लिहिण्याची पद्धत विचारून घेतली. तेव्हापासून त्यांनी प्रतिदिन चिंतन सारणीनुसार व्यष्टी साधनेचे प्रयत्न करायला आरंभ केला.
४. भाव : ते पुष्कळ वेळा ‘परात्पर गुरुदेवच माझ्याकडून सेवा करून घेत आहेत. त्यांच्या इच्छेनेच होत आहे’, असे सहजतेने सांगतात. कारखान्याचे प्रमुख त्यांना सांगतात, ‘‘तुम्ही ‘कार्यालयातील सदस्यांनी साधना करावी’, यासाठी चांगले प्रयत्न करत आहात.’’ तेव्हा बबनदादा त्यांना सांगतात, ‘‘हे सर्व परात्पर गुरुदेवांचेच विचार आहेत. ते जसे विचार देतात, तसेच मी करतो.’’ श्री. बबन अडणेकरदादांची गुणवैशिष्ट्ये जाणून माझ्या मनात परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञताभावात वृद्धी झाली.’
५. सामाजिक बांधिलकी जपणे : लिबिया येथे नोकरी करतांना त्यांच्या लक्षात आले, ‘मंदिरातील (बबनदादांकडे मंदिराचे दायित्व आहे.) पुजारी दानपेटीतील धनाचा उपयोग वैयक्तिक गोष्टींसाठी करत आहेत.’ ते थांबवण्यासाठी बबनदादांनी काही सदस्यांची निवड करून एक समिती स्थापन केली. आता वर्षाच्या अखेरीस सर्व सदस्यांच्या उपस्थितीत दानपेटीचे कुलूप उघडले जाते आणि जमा झालेल्या रकमेची नोंद ठेवली जाते. त्या रकमेचा उपयोग मंदिराच्या देखभालीसाठी केला जातो. आता मंदिराची व्यवस्था पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, ‘‘हे सर्व श्री. अडणेकर यांच्यामुळे झाले.’’ त्या मंदिरात बबनदादांनी धर्मशिक्षणाच्या ‘फ्लेक्स’ची ‘ए ४’ आकाराच्या कागदावर प्रत काढून सूचना फलकावर व्यवस्थितपणे लावली आहे.
६. सेवेची तळमळ
६ अ. लिबिया येथील एका मंदिरात प्रत्येक शुक्रवारी नामसत्संग चालू करणे : बबनदादांकडे लिबिया येथील एका मंदिराच्या देखरेखीचे दायित्व आहे. त्यांच्या मनात विचार आला, ‘सनातन ‘चैतन्यवाणी ॲप’च्या माध्यमातून तेथील लोकांना सांगून नामजप आरंभ करायला पाहिजे.’ त्यांनी मंदिराच्या सूचना फलकावर कार्यक्रमाची सूचना लावली. आता तेथे प्रत्येक शुक्रवारी कुलदेवता आणि अन्य सात नामजप (शिव, कृष्ण, हनुमान, श्रीराम, दत्त, श्री दुर्गादेवी, गणपति यांचा नामजप) प्रत्येकी १० मिनिटे लावला जातो. प्रत्येक नामजपानंतर प्रार्थना आणि सूर्यमंत्राचे महत्त्व सांगून लोकांकडून सूर्यमंत्राचा जप करण्यास आरंभ झाला आहे.
६ आ. ‘येथे येऊन पुष्कळ शांती लाभत असून हा कार्यक्रम प्रत्येक शुक्रवारी व्हायला हवा’, असे सत्संगाला आलेल्या कारखान्याच्या प्रमुखांनी सांगणे, श्री. अडणेकर यांनी सनातन संस्थेचे ‘ऑनलाईन’ सत्संग ‘एल्.सी.डी.’ दूरदर्शन संचावर दाखवण्याचा प्रस्ताव कारखान्याच्या प्रमुखांकडे मांडणे अन् त्यांनी ‘व्यवस्था करतो’, असे सांगणे : एकदा शुक्रवारच्या नामसत्संगाला त्यांच्या कारखान्याचे प्रमुख उपस्थित होते. नामजपाचे सत्र पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘येथे येऊन मला पुष्कळ शांती लाभली आणि हा कार्यक्रम आता प्रत्येक शुक्रवारी व्हायला हवा.’’ श्री. अडणेकर यांनी सनातन संस्थेचे ‘ऑनलाईन’ सत्संग ‘डाऊनलोड’ करून भ्रमणभाषच्या माध्यमातून पुढील नामसत्संगात दाखवण्याचा विचार केला. त्यांच्या मनात विचार आला, ‘भ्रमणभाषपेक्षा दूरदर्शन संचावर सत्संग दाखवले, तर चांगले होईल.’ प्रमुखांनाही ते पटल्याने त्यांनी सांगितले, ‘‘मी व्यवस्था करतो.’’
६ इ. प्रमुखांनी ४० इंचाचा ‘एल.सी.डी.’ दूरदर्शन संच खरेदी करण्याचे मंजूर करणे आणि ‘परात्पर गुरुदेवच हे सर्व करून घेत आहेत’, असे श्री अडणेकर यांना वाटणे : दुसर्याच दिवशी आस्थापनातील एका ज्येष्ठ कर्मचार्याने श्री. अडणेकर यांना सांगितले, ‘प्रमुखांनी ४० इंचाचा ‘एल.सी.डी.’ दूरदर्शन संच खरेदी करण्याचे मंजूर केले आहे.’’ आस्थापनाच्या प्रमुखांनी श्री. अडणेकर यांना सांगितले, ‘‘डिश’चे काही ‘कनेक्शन’ घ्यायचे असेल, तर घेऊ शकतो.’’ तेव्हा श्री. अडणेकर यांनी त्यांना सांगितले, ‘‘डिश’चे ‘कनेक्शन’ घेतले, तर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवणारे कार्यक्रमही बघावेसे वाटणार. त्यामुळे ‘डिश’चे ‘कनेक्शन’ घ्यायला नको. या दूरदर्शन संचावर केवळ सत्संग दाखवूया.’’ त्यावर प्रमुख त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही जे सांगत आहात, ते अगदी योग्य आहे. तुम्हाला जो कार्यक्रम किंवा सत्संग दाखवायचा आहे, तो या दूरदर्शन संचावर दाखवा.’’ प्रमुखांचे बोलणे ऐकून श्री. अडणेकर यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला. त्यांना वाटले, ‘परात्पर गुरुदेवच हे सर्व करून घेत आहेत.’
७. कृतज्ञताभाव : बबनदादांनी ५ वर्षांपूर्वी दुर्ग येथे घर बांधले. त्यांनी ‘हा आश्रम आहे’, या भावाने घर बांधले. त्यातील एक खोली त्यांनी सत्संग आणि एक खोली साधकांना निवासासाठी ठेवली होती. काही प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला. अशा विपरित परिस्थितीतही त्यांनी गुरुपौर्णिमेसाठी अर्पण दिले. नंतर त्यांना ‘स्वतःचे घर परात्पर गुरुदेवांचा आश्रम आहे’, याची पुन्हा जाणीव झाल्यावर त्यांनी घर विकण्याचा निर्णय रहित केला. परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून त्यांना अन्य पर्याय सुचवला.
८. भाव : ते पुष्कळ वेळा ‘परात्पर गुरुदेवच माझ्याकडून सेवा करून घेत आहेत. त्यांच्या इच्छेनेच होत आहे’, असे सहजतेने सांगतात. कारखान्याचे प्रमुख त्यांना सांगतात, ‘‘तुम्ही ‘कार्यालयातील सदस्यांनी साधना करावी’, यासाठी चांगले प्रयत्न करत आहात.’’ तेव्हा बबनदादा त्यांना सांगतात, ‘‘हे सर्व परात्पर गुरुदेवांचेच विचार आहेत. ते जसे विचार देतात, तसेच मी करतो.’’
९. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्तच्या भावसोहळ्यात आलेली अनुभूती
९ अ. भावसोहळ्याला आरंभ झाल्यानंतर कार्यालयातून एक रेखाचित्र मिळत नसल्याचा भ्रमणभाष येणे, श्री. अडणेकर यांनी कार्यालयात १५ मिनिटानंतर येणार असल्याचा निरोप देऊन निराशेनेच जाण्याची सिद्धता करणे, नंतर कार्यालयातून ‘रेखाचित्र मिळाले असून येण्याची आवश्यकता नाही’, असा भ्रमणभाष येणे अन् हे ऐकून बबनदादांचा कृतज्ञताभाव जागृत होणे : श्री. अडणेकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्तचा भावसोहळा बघायला सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी भावसोहळ्याच्या दिवशी पहाटे ३ वाजता उठून घराची स्वच्छता केली. भावसोहळा आरंभ झाल्यानंतर १५ मिनिटांतच त्यांना कार्यालयातून बोलावणे आले. कार्यालयातील अधिकार्यांनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही लगेच कार्यालयात यावे. काही रेखाचित्रे (‘ड्रॉइंग’) सापडत नाहीत.’’ (श्री. अडणेकर यांच्याकडे कार्यालयाची रेखाचित्रे (ड्रॉइंग) जपून ठेवण्याचे दायित्व आहे.) त्या वेळी भावसोहळ्यात गुरुपादुका पूजनाचे चलचित्र दाखवत होते. त्यांनी अधिकार्यांना सांगितले, ‘‘मी १५ मिनिटांनंतर येतो.’’ ते निराश हाेऊन जाण्याची सिद्धता करत होते. त्याच वेळी कार्यालयातील अधिकार्यांनी त्यांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘रेखाचित्रे (ड्रॉइंग) मिळाली आहेत. आता तुम्हाला येण्याची आवश्यकता नाही.’’ अधिकार्यांचे बोलणे ऐकून बबनदादांचा कृतज्ञताभाव जागृत झाला. त्यांच्या डोळ्यांतून पुष्कळ वेळ भावाश्रू येत होते. त्या दिवसापासून त्यांनी साधनेविषयक सूचनांनुसार आचरण करण्याचा आणि नामजप करायला आरंभ केला.
श्री. बबन अडणेकरदादांची गुणवैशिष्ट्ये जाणून माझ्या मनात परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञताभावात वृद्धी झाली.’
– श्री. संजयकुमार सिंह, पाटणा, बिहार. (२६.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |