सांपद्रायिक साधनेत अडकल्यामुळे साधना आणि अध्यात्म जाणून न घेता स्वतःचेच खरे सांगणारे नातेवाईक !

माझा भाऊ एका संप्रदायानुसार साधना करत आहे. त्याच्याविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. समस्या निवारणासाठी आध्यात्मिक कारण आणि त्यावरील उपाय ऐकून न घेता ‘स्वतःचा देवच श्रेष्ठ आहे’, असे सांगणे

माझ्या भावाला आर्थिक अडचणी आहेत. मागील २५ वर्षे त्याचा कोणताही व्यवसाय नीट चालत नाही आणि त्यामध्ये त्याला स्थिरता आलेली नाही. मी माझ्या भावाला म्हणालो, ‘‘हे सर्व प्रश्न पूर्वजांच्या त्रासामुळे असू शकतात. त्यासाठी तू ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप कर.’’ त्या वेळी माझा भाऊ माझ्याशी वादविवाद करत म्हणाला, ‘‘आमचा एकच देव श्रेष्ठ आहे. त्यामुळे इतर देवांची उपासना करण्याची आवश्यकता नाही. आमचा एक देव सोडला, तर इतर कोणतेच देव नाहीत.’’

२. सनातनची देवतांची सात्त्विक चित्रे देवघरातून काढून टाकणे आणि स्वतःच्या संप्रदायाच्या देवतांचीच चित्रे ठेवणे

मी आणि माझा भाऊ एकत्र रहातो. मी देवघरामध्ये नेहमीच्या धातूंच्या देवतांच्या मूर्ती आणि सनातनची देवतांची सात्त्विक चित्रे ठेवली होती. माझ्या भावानेही त्यांच्या संप्रदायाची चित्रे ठेवली होती; पण काही वर्षांनंतर भावाने मला न विचारता सनातनची सात्त्विक चित्रे देवघरातून काढून टाकली आणि स्वतःच्या संप्रदायाची चित्रे तशीच ठेवली.

३. संप्रदायाचे मंदिर तोडण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने आंदोलन करणे; परंतु त्या संप्रदायाने आंदोलनात सहभाग न घेणे

भावाच्या संप्रदायाचे एका शहरातील एक मोठे मंदिर शासनाकडून तोडले जाणार होते. त्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण भारतभर आंदोलने आयोजित करण्यात आली होती. तेव्हा स्थानिक आंदोलनासाठी मी माझ्या भावाच्या संप्रदायाच्या वरिष्ठांना भेटून सांगितले, ‘‘शासन तुमचे मंदिर तोडणार आहे. हिंदु जनजागृती समिती शासनाच्या विरोधात आंदोलन करणार आहे. तेव्हा तुमचे काही साधक आंदोलनास पाठवा.’’ त्या वेळी ते ‘हो’ म्हणाले; पण प्रत्यक्षात आंदोलनामध्ये त्यांच्या संप्रदायाचे कुणीच आले नाही.

४. सत्संग आणि साधना यापेक्षा जेवणासारख्या बाह्य गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाणे

त्या संप्रदायाचे साप्ताहिक सत्संग आणि प्रवचने चांगली असतात. प्रवचन झाल्यानंतर पंचपक्वानाचे जेवण असते. ते सिद्ध करण्यासाठी त्यांचा पुष्कळ वेळ जातो. ‘सत्संग आणि साधना यांपेक्षा अशा गोष्टींना त्यांच्याकडे अधिक महत्त्व दिले जाते’, असे मला वाटते.’

– एक साधक (६.९.२०२३)