Mayank Jain Bangaladesh Hindu : …अन्यथा ढाक्यावर बाँब वर्षाव करून बांगलादेश सरकारचे डोके ठिकाण्यावर आणा ! – मयांक जैन

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांवरून आंतरराष्ट्रीय विषयांवरील प्रसिद्ध तज्ञ मयांक जैन यांनी व्यक्त केला संताप !

आंतरराष्ट्रीय विषयांवरील प्रसिद्ध तज्ञ मयांक जैन

नवी देहली – बांगलादेशातील हिंदूंना वाटते की, शेजारी असलेले भारतातील १०० कोटी  हिंदू त्यांच्यासाठी काही करत नाहीत. ‘नेहरू-लियाकत अली करारा’नुसार आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांची आपण काळजी घेतली पाहिजे. बांगलादेशाच्या निर्मितीनंतरही शेख मुजीबूर रहमान यांच्यासमवेत असा करार झाला होता; परंतु बांगलादेशाने तसा प्रयत्न खर्‍या अर्थाने कधीच केला नाही. आतातर तेथील सर्वच अल्पसंख्यांक हिंदूंना भारतात आणले पाहिजे. यामुळे बंगाल आणि आसाम येथील धार्मिक स्तरावर झालेल्या लोकसंख्या पालटावर (इस्लामीकरणावर) परिणाम होऊ शकेल. भारत-बांगलादेश सीमेवर असलेल्या हिंदूंना भारतात घेतले पाहिजे. हिंदूंची ओळख वैद्यकीयदृष्ट्या सहजपणे केली जाऊ शकते. भारताने या हिंदूंना भूमी देऊन त्यांचे रक्षण केले पाहिजे, तसेच सैन्याला पाचारण केले पाहिजे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारतीय सैन्य यांचे १० सहस्र ट्रक यांना सीमेपासून २०० किलोमीटर आत तैनात केले पाहिजे. आसाममधील तेजपूर आणि बंगालच्या बागडोगरा या भारतीय वायूदलाच्या तळांमध्ये राफेल विमानांद्वारे गस्त घातली पाहिजे. अशा प्रकारे सैनिकी दबाव आणूनही बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर ढाक्यावर बाँबचा वर्षाव करून तेथील सरकारचे डोके ठिकाणावर आणा, असे विधान देहलीतील आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ञ मयांक जैन यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.

जैन यांनी वर्ष २००१ मध्ये ‘बांगला क्रिसेंट’ नावाचा एक माहितीपट दिग्दर्शित केला होता. त्यामध्ये त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर असलेल्या राज्यांमध्ये मुसलमानांची वाढती लोकसंख्या आणि हिंदूंची दैनावस्था यांवर प्रकाश टाकला होता.