‘पू. निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) गेल्या काही दिवसांपासून रुग्णाईत आहेत. मला पू. दातेआजींना भेटण्याची ओढ लागली होती. आम्ही (मी आणि माझी पत्नी (सौ. श्रावणी) गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. दातेआजींचे दर्शन घेतले. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पू. दातेआजींच्या खोलीत जाण्यापूर्वी
अ. मी स्वतःच्या खोलीतून बाहेर पडताच माझा अंतर्मनातून नामजप होऊ लागला.
आ. मी पू. आजींच्या खोलीच्या दाराजवळ पोचल्यावर मला आतून थंड वाटले.
२. पू. दातेआजींच्या खोलीत गेल्यावर
अ. पू. आजींच्या खोलीत प्रवेश करतांना ‘मी एका पोकळीत जात आहे’, असे मला जाणवले. मला तेथे केवळ प्रकाश दिसत होता.
आ. पू. आजींकडे पाहिल्यावर माझे मन निर्विचार झाले आणि माझे ध्यान लागल्यासारखे झाले.
इ. ‘मी एका उच्च लोकात आहे’, असे मला जाणवत होते.
ई. मला पुष्कळ आनंद होत होता.
उ. ‘पू. आजी माझ्याशी बोलत आहेत. त्या माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
ऊ. मला पू. आजींच्या खोलीत पुष्कळ शांत वाटत होते. ‘वातावरण स्थिर आहे’, असे मला जाणवले.
ए. खोलीत वेगळाच सुगंध येत होता. मला खोलीत सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवत होते.
ऐ. मला ‘खोलीतून बाहेर जाऊ नये’, असे वाटत होते.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२४)
|