पाकच्या स्थितीची बांगलादेशातील स्थितीशी तुलना केल्यावर पाकचे सैन्यदलप्रमुख मुनीर यांचे विधान !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर कुणी पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला, तर मी अल्लाची शपथ घेतो, आम्ही त्यांच्याशी लढू. अल्लाच्या दयेने पाकिस्तानी सैन्य अशांतता आणि अराजकता दूर करण्यात यशस्वी होईल, असे विधान पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी केले आहे. इस्लामाबादमधील राष्ट्रीय उलेमा अधिवेशनात ते बोलत होते. पाकिस्तानातील स्थितीचा बांगलादेशातील स्थितीशी सामाजिक माध्यमांतून तुलना करण्यात येत असल्यावरून त्यांनी हे विधान केले आहे.
जनरल मुनीर पुढे म्हणाले की,
१. देश किती महत्त्वाचा आहे हे, जाणून घ्यायचे असेल, तर इराक, सीरिया आणि लिबिया यांकडे बघा. पाकिस्तानचे अस्तित्व कायम राहील; कारण ते टिकवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. लाखो नेते आणि लाखो विद्वान यांनी पाकिस्तानसाठी बलीदान दिले आहे; कारण स्वतःपेक्षा देश महत्त्वाचा आहे.
२. गेल्या काही वर्षांत सामाजिक माध्यमांतून सैन्यावर अधिक टीका होत आहे. त्यामुळे देशाची राजकीय आणि सामाजिक जडणघडण बिघडत आहे. असे प्रयत्न करणार्यांवर अटक करून कायदेशीर कारवाई केली जात आहे.
३. अल्लाच्या आदेशानुसार पाकिस्तानी सैन्य देशातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. शरीयत आणि राज्यघटना न मानणार्यांना मी पाकिस्तानी मानत नाही.
संपादकीय भूमिकापाकच्या स्थापनेपासून तेथे अराजकच आहे. आता ते परिसीमा गाठेल आणि त्यातून पाकिस्तानचे ४ तुकडे होतील, हे सत्य मुनीर स्वीकारत नसले, तरी ती वस्तूस्थिती आहे ! |