सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

रत्नागिरी येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन  

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

रत्नागिरी – उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने  हत्या करण्यात आली. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याने त्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. हत्या करणार्‍या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि ‘लव्ह जिहाद’अन् ‘धर्मांतर’ विरोधी कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जयस्तंभ येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

कु. अंकिता राजेशिर्के, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी : शासनाने लाडकी बहीण योजना चालू केली. यापेक्षा बहिणींच्या सुरक्षेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. हत्या करणार्‍यांना फाशी झाली पाहिजे.

श्री. दिगंबर शिंदे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी : अन्य धर्मीय ज्याप्रकारे एकत्र येतात, तसे आपण एकत्र येत नाही. हिंदूंच्या या मानसिकतेमुळे अन्य धर्मीयांचे फावते आहे.

श्री. दीपकसिंग देवल, मरुधर समाज, रत्नागिरी : आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही; मात्र उद्या हिंदू रस्त्यावर आले, तर सगळ्यांनाच त्रास होईल. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सशक्त कायदा व्हावा, अशी आमची मागणी आहे.

श्री. गणेश गायकवाड, जिल्हाप्रमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी : महिला गायब होण्याच्या घटना वाढत आहेत. खरे पहाता आतापर्यंत गुन्हेगाराला फाशी होणे अपेक्षित आहे. अजून किती हत्या झाल्यावर शासन जागे होणार आहे ?

श्री. महेश मयेकर, संस्थापक अध्यक्ष, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर : ‘लव्ह जिहाद’ला अनेक तरुणी बळी पडत असतांना शासनाला जाग येत नाही. देशातील ८ राज्यांत लव्ह जिहादाच्या विरोधात कायदा होऊ शकतो, तर महाराष्ट्रात का नाही ?

सौ. स्वाती जोशी, विश्व हिंदु परिषद, रत्नागिरी : हिंदु बहुसंख्य असूनही महिलांनाही रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. हत्या, धर्मांतर, बलात्कार ही मालिका अशीच चालू राहिली, तर आपण या देशात राहू शकतो का ? संघटित होऊन आपल्याला विरोध करायलाच हवा.

सौ. आदिती भाटकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी : गुन्हे मोजू शकत नाही, असे अनेक गुन्हे गुन्हेगार करत आहे. आपण संघटित झालो नाही, तर उद्या अनेक दाऊद निर्माण होतील.

श्री. विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती : बहुसंख्य हिंदू अल्पसंख्यांक होत आहेत. हिंदु मुलींची कशा प्रकारे फसवणूक होत आहे, हे गावागावांतील प्रत्येक मुलीपर्यंत पोचायला हवे. ज्या मुली धर्माचरण करत नाहीत, त्यांच्या बाबतीत असे प्रकार अधिक होतात. त्यामुळे आपल्या घरात संस्कृती रुजवा, मुलाबाळांवर संस्कार करा, ही काळाची आवश्यकता आहे.

श्री. संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती : लव्ह जिहाद रोखण्यासाठी शासनाने ‘अँटी रोमिओ स्क्वाड’सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. अशा घटना रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधून मुली-मुलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात यावे, तसेच त्यांच्यासाठी प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करावे.


विशेष

१. आंदोलन चालू असतांना अचानक पाऊस चालू झाला त्या वेळेला आंदोलनात सहभागी झालेल्यांपैकी कुणीही जागचे हलले नाही.

२. आंदोलनाच्या समारोपाच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद रानडे यांनी उस्फूर्तपणे शंखनाद केला.

३. श्री मरुधर विष्णु समाजाचे श्री. दीपक देवल यांनी डाव्या हाताला दुखापत झालेली असतानाही आंदोलनाची सेवा करून आंदोलनात सहभागी झाले.


उपस्थिती

श्री महापुरुष देवस्थान, कोकण नगर, रत्नागिरीचे श्री. प्रसन्न बिर्जे, श्री मरुधर विष्णु समाजाचे श्री. विराम चौधरी, श्री. जितेंद्रसिंह, श्री. भोलाराम चौधरी, इस्कॉनचे श्री. विजय भाटकर, गणपतीपुळेचे माजी सरपंच श्री. महेश केदार, खोत श्री. विजय भिडे, माजी नगरसेवक श्री. महेंद्र साळवी, कुवारबाव व्यापारी संघाचे सचिव श्री. प्रभाकर खानविलकर, रा.स्व. संघाचे श्री. प्रदीप दांडेकर, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, गोप्रेमी अमितराज खटावकर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कुवारबावचे श्री. मंगेश राऊत, श्री. सुशील ऐवळे, हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सागर कदम, श्री. गौरव पावसकर, राजस्थान क्षत्रिय संघ रत्नागिरीचे श्री. रविंद्रसिंह राणावत, गो सेवा संघाचे सचिव श्री. सुशील कदम, श्री चंडिका मंदिर, गणपतीपुळेचे सचिव श्री. विनोद माने, धर्मजागरण मंचचे श्री. विजय यादव, श्री. चंद्रकांत राऊळ, श्री. भाई दळी, निवळी येथील श्री. संतोष शिंदे, पाचल येथील श्री. शैलेश जंगम, खेडशी येथील श्री. जीवन जाधव, काजरघाटी येथील श्री. दुर्गेश पिलणकर, मनसेचे श्री. तेजस साळवी, चिंचखरी येथील श्री. संतोष बोरकर, गड दुर्गप्रेमी श्री. विकी मोंडकर, श्री हनुमान मंदिर, मजगाव रोडचे श्री. किशोर भुते, श्री. ओमकार गर्दे, गोळप सडा येथील श्री. शशांक कोलथरकर, जुवे येथील अनिमेष कीर, श्री माधव ताटके, भाजपचे श्री. दादा ढेकणे, श्री. भाई राऊत, कु. संस्कृती शेडबाळे, सौ. जान्हवी पोसरेकर, मीरा लिंगायत, सनातन संस्थेच्या सौ. शुभांगी मुळ्ये, सौ. जान्हवी गुळेकर, श्री. गोविंद भारद्वाज, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर, श्री. तन्मय जाधव आदी उपस्थित होते.