‘सनातन संस्थेच्या १२८ व्या संत (कै.) पू. सौदामिनी कैमलआजी (देहत्यागासमयी वय ८२ वर्षे) यांचे कुटुंब आणि आमचे कुटुंब पूर्वी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे रहात होते. तेव्हा आमची जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर पू. आजी आणि त्यांचा मुलगा श्री. नंदकुमार कैमल केरळ येथे अध्यात्मप्रसारासाठी गेले. पू. आजी मला किंवा माझे वडील श्री. विजय लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७१ वर्षे) यांना अधून मधून संपर्क करत असत आणि गुरुमहिमेचे वर्णन करत असत.
वर्ष २०२४ च्या जूनमध्ये माझी आणि श्री. नंदकुमार यांची गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त भेट झाली. तेव्हा मी त्यांच्याकडे पू. आजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अलीकडे मी २ – ३ वेळा कैमलआजींचा उल्लेख ‘पू. कैमलआजी’ असा केला होता, तसेच आजींनी देहत्याग केल्यावर ‘त्यांनी संतपद प्राप्त केले आहे’, असे मला वाटले. ‘ही पू. आजींच्या संतत्वाबद्दल मला मिळालेली पूर्वसूचना होती’, असे मला वाटले.’
– श्री. अमेय विजय लोटलीकर, फोंडा, गोवा. (१८.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |