Bangladesh Turn InTo An Islamic State : बांगलादेशाच्या राज्यघटनेतून ‘राष्ट्रवाद’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवण्याचा प्रयत्न

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश मुसलमानबहुल देश असूनही त्याला लोकशाही देश बनवण्यात आले आहे; मात्र आता सत्तापालट झाल्यानंतर त्याला इस्लामी देश करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू झाल्या आहेत. देशाची राज्यघटना नव्याने लिहिण्याची मागणी होत असतांनाच सध्याच्या राज्यटनेतून ‘राष्ट्रवाद’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. बांगलादेशातील २ राजकीय पक्षांनी हे शब्द काढून टाकण्याच्या प्रस्तावांवर टीका केली आहे.

बांगलादेशातील अंतरिम सरकारने राज्यघटना सुधार आयोगाची नियुक्ती करण्यात केली होती. या समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालात समता, मानवी प्रतिष्ठा, सामाजिक न्याय यांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘बहुवचनवाद’ शब्द समाविष्ट करून राष्ट्रवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द काढण्यात यावे, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशात जिहादी त्यांच्या राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटवून तेथे ‘इस्लामी देश’ आदी शब्द घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची हिंदुद्वेषी मानसिकता गेल्या काही वर्षांपासून जग पहात आहे. या उलट भारताच्या राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटवून तेथे हिंदु राष्ट्र घातला, तर भारत ‘विश्‍वगुरु’च्या वाटचाल करण्याच्या दृष्टीने ते पहिले पाऊल असेल. यातून दोन्ही मानसिकतेतील भेद लक्षात येतो !