सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी ‘गुरु’ म्हणून भाव निर्माण करण्यास साहाय्य करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रती ‘गुरु’ म्हणून भाव ठेवण्यात न्यून पडणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘सप्‍तर्षींनी वर्ष २०१९ मध्‍ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘आध्‍यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित केले. यापूर्वी सद्गुरु म्हणून दोघींबद्दल माझ्या मनामध्ये भाव होता; परंतु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रती माझा जसा भाव आहे, तसा त्या माझ्या ‘गुरु’ आहेत’, असा भाव ठेवण्यात मी न्यून पडत होतो. ‘माझा संपर्क श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी येत असल्याने त्यांच्याविषयी माझ्या मनात ‘गुरु’ म्हणून भाव का निर्माण होत नाही ?’, या विचारांनी काही वेळा मला ‘मी चुकत आहे’, असे वाटून वाईट वाटायचे. त्यासाठी मला ‘वेगळे प्रयत्नच करायला हवेत’, याची जाणीव झाली.

श्री. संदीप शिंदे

२. भ्रमणभाषवर ‘वॉलपेपर’ म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे छायाचित्र लावणे आणि ‘काही दिवसांनी त्यांच्याप्रतीचा भाव पूर्वीपेक्षा वाढला आहे’, असे लक्षात येणे

माझ्या भ्रमणभाषवर ‘वॉलपेपर’ (भ्रमणभाष चालू केल्यावर प्रथम वर दिसणारे चित्र) म्हणून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे छायाचित्र असायचे. त्या जागी मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे छायाचित्र ‘वॉलपेपर’ म्हणून लावले. मी जेव्हा भ्रमणभाष पाहीन, तेव्हा मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे छायाचित्र पहाता येईल आणि आपोआपच त्यांचे स्मरण सातत्याने होऊन माझी त्यांच्यावरील श्रद्धा अधिक दृढ होईल. काही दिवसांनी ‘माझ्यामध्ये त्यांच्याप्रतीचा भाव हा पूर्वीपेक्षा वाढला आहे’, असे माझ्या लक्षात आले.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना प्रदान केलेल्या उत्तराधिकारी पत्रातील वाक्य अंतर्मनात जाणे

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव सोहळा गोव्यात पार पडला. या दिव्य ब्रह्मोत्सवामध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी धातूच्या पत्र्यावर कोरलेले त्यांच्या हस्ताक्षरातील ‘उत्तराधिकारी पत्र’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना प्रदान केले. त्या पत्रात ‘श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌शक्ति’ यांचा प्रत्येक शब्द, म्हणजे माझा शब्द आहे’, हे वाक्य लिहिले आहे. ‘ते वाक्य माझ्या अंतर्मनात गेले’, असे मला जाणवले. या क्षणी गुरूंनी ‘माझ्या मनाची द्विधा अवस्था पूर्णतः दूर केली’, असे मला जाणवले. त्या क्षणानंतर मला पुन्हा कधीही वरील विचार आले नाहीत.

४. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या उत्तराधिकारी पत्रातील ‘जसे वेद चिरंतन आहेत, तसे माझे हे शब्द चिरंतन आहेत’, या वाक्याने श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याबद्दल ‘गुरु’ म्हणून भाव निर्माण करणे

यातून ‘गुरुदेव साधकांची श्रद्धा आणि मनातील विचार यांमध्ये जरी काही अडथळे असतील, तर तेही कसे दूर करतात’, हे माझ्या लक्षात आले. त्यांनी त्या पत्रात या संदर्भात अजूनही एक वाक्य लिहिले होते, ‘जसे वेद चिरंतन आहेत, तसे माझे हे शब्द चिरंतन आहेत.’ श्री गुरूंनी त्यांच्या एका वाक्याने माझ्या मनात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याबद्दल ‘गुरु’ म्हणून भाव निर्माण केला. गुरूंचे शब्द हे जसे चिरंतन आहेत, तसेच ‘गुरूंचे शब्द हे साधकांच्या प्रगतीमधील सर्व प्रकारच्या बाधा दूर करणारे आहेत’, हे मला अनुभवता आले. त्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०२४)