मंदिराच्या वास्तूतील स्थुलातील भाग आणि त्यांच्याशी संबंधित गुरुकृपायोगातील अष्टांग साधना !

गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, याला ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ !

गुरुकृपायोगानुसार साधनेची व्यष्टी साधना (वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न) अन् समष्टी साधना (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न), अशी दोन अंगे आहेत. व्यष्टी साधना आणि समष्टी साधना हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे २ प्रकार आहेत.

पाया जितका घट्ट आणि भक्कम असतो, त्यावर एखाद्या वास्तूचा टिकाऊपणा अवलंबून असतो. त्यानुसार स्वभावदोष आणि अहं निमूर्लनाद्वारे अंतर्शुद्धी साधल्यास साधनेच्या भक्कम पायावर साधनेचे मंदिर उभे रहाते. हा विषय दर्शवणारे लिखाण आणि त्यासंबंधीचे चित्र दिले आहे.

‘गुरुकृपायोगानुसार साधनामंदिरा’चे अष्टांग साधनेला अनुसरून असलेले विविध भाग !