१. अंत्यविधीपूर्वी
अ. ‘पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय यांच्या ‘अंत्यविधीची सेवा करायची आहे’, असा निरोप मला मिळाल्यावर गुरुकृपेने ही सेवेची संधी मिळाली आहे’, असे मला वाटले. ती सेवा माझ्याकडून उत्स्फूर्तपणे स्वीकारली गेली.
आ. सुश्री (कु.) संगीता मेनराय पू. (कै.) मेनरायआजोबांची मधली कन्या) मला म्हणाल्या, ‘‘पू. आईंचा (सनातनच्या ४५ व्या (समष्टी) संत पू. कै. (सौ.) सूरजकांता मेनराय यांचा) वर्षश्राद्ध विधी तुम्ही केला होता आणि आता पू. पिताजींचा अंत्यविधी तुम्ही करत आहात. ‘गतजन्मी तुम्ही पू. पिताजींचे पुत्र होतात’, असे मला वाटते.’’ तेव्हा माझा भाव जागृत झाला.
२. अंत्यविधीच्या वेळी
अ. अंत्यविधीची सेवा करतांना माझे मन पुष्कळ शांत होते.
आ. सर्व कृती अगदी सहजपणे होत असून कुठेच जराही जडत्व जाणवले नाही.
इ. ही सेवा करतांना ‘मी एखादे चांगले कार्य करत आहे’, असे मला जाणवले.
ई. ‘५.६.२०२४ या दिवशी अंत्यविधीच्या वेळी सर्व नियोजनानुसार चालू आहे’, असे मला जाणवले.
उ. सर्व विधी सूक्ष्मस्तरावर घडत असून स्थुलातल्या कृतीही अगदी सहजतेने होत आहेत, असे मला जाणवले.
ऊ. मला नामजपाची सतत आठवण होऊन ‘माझा नामजप अखंड चालू आहे’, असे मला जाणवले.
ए. संपूर्ण विधीच्या वेळी माझे मन स्थिर होते.
३. अग्नीसंस्कारांच्या वेळी
अ. ‘स्मशानभूमीत अग्नीसंस्काराच्या वेळी त्यातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
आ. बाहेरील वातावरणात हवा पुष्कळ गरम असतांनाही मला स्मशानभूमीत गारवा जाणवला.
इ. अग्नीसंस्कारांच्या वेळी प्रदक्षिणा घालतांना अग्नीदेव प्रसन्न असल्याने अग्नीचा दाह जाणवला नाही.
ई. दहनाच्या वेळी ‘अग्नीदेव आणि वायुदेवता प्रसन्न होऊन पू. मेनरायकाकांचा मृतदेह आनंदाने स्वीकारला’, असे मला जाणवले.
४. चिता पुष्कळ शांत आणि थंड होणे
६.५.२०२४ या दिवशी स्मशानभूमीत अस्थी गोळा करण्यासाठी गेलो असता ‘चिता पुष्कळ शांत आणि थंड झाली आहे’, असे मला जाणवले. एरव्ही दुसर्या दिवशी चिता एवढी शांत होत नाही.’
– श्री. उमेश नाईक (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (७.६.२०२४)
|