उत्साही, आनंदी आणि सेवेची तळमळ असलेल्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उमा पै (वय ८९ वर्षे) !

‘उत्तर कन्नड जिल्ह्यात अध्यात्मप्रसाराची सेवा करत असतांना मला ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उमा पै (मामी, वय ८९ वर्षे) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीमती उमा पै

१. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवून कृती करणे

मामींचे वय झाल्यामुळे त्यांना बर्‍याच गोष्टी आठवत नाहीत. त्यासाठी त्या प्रत्येक गोष्ट लिहून ठेवून त्यानुसार नियोजन करतात, उदा. त्यांच्याकडे कोण आणि केव्हा येणार ? किती जणांचा स्वयंपाक करायचा आहे ? इत्यादी. त्यानंतर त्या लिहून ठेवल्याप्रमाणे कृती करतात.

२. स्वयंशिस्त

त्या प्रतिदिन पहाटे उठणे, व्यायाम करणे, आध्यात्मिक उपाय करणे, देवपूजा करणे, भजन आणि स्तोत्रपठण करणे, या कृती न चुकता करतात.

३. उत्साही आणि आनंदी

सौ. तारा शेट्टी

मामींची मुले विदेशात असतात. त्या घरी एकट्याच रहातात, तरीही त्या नेहमी सकारात्मक आणि आनंदी असतात. त्या प्रतिदिन मानसपूजा करतात. त्या गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात. त्यांच्या समवेत रहातांना मलाही आनंद आणि उत्साह वाटतो.

४. इतरांना साहाय्य करणे

त्या सर्वांवर प्रेम करतात. एकदा त्यांच्याकडील गृहकृत्य साहाय्यक (घरकाम करणारा) मुलाला नोकरी मिळत नव्हती. त्यांनी त्या मुलाला काम मिळेपर्यंत साहाय्य केले, तसेच त्यांनी दुसर्‍या एका गृहकृत्य साहाय्यक मुलाला भाड्याने घर मिळवून देण्यासाठी साहाय्य केले.

५. व्यष्टी साधनेचा आढावा तळमळीने देणे

त्या प्रत्येक बुधवारी व्यष्टी साधनेचा आढावा न चुकता देतात. त्यांना व्यष्टी साधनेचा आढावा देण्याची पुष्कळ तळमळ आहे.

६. राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान

त्या प्रतिदिन दूरचित्रवाहिनीवर वृत्ते पहातात. त्यात आपल्या देशाची सध्याची स्थिती, राजकीय घडामोडी किंवा धर्माविषयी काही आल्यास मामी ते लिहून ठेवतात. एवढेच नव्हे, तर वेळ आल्यास त्या आम्हाला त्याविषयी सांगतात, तसेच त्या कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील प्रत्येक विषय वाचून त्याविषयी लिहून ठेवतात आणि त्याचा अभ्यास करतात. त्यांना याच जीवनात ‘हिंदु राष्ट्र’ पहाण्याची पुष्कळ तळमळ आहे.

७. उतारवयातही सेवा करणे

त्या प्रत्येक आठवड्याला त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या मंदिरात प्रसिद्धी फलक लिहितात, तसेच त्या गुरुपौर्णिमेसाठी अर्पण मिळवण्याची सेवा करतात.

८. गुरूंप्रती भाव

८ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आठवणीत रमणे : गुरूंविषयी काही विषय निघाल्यावर मामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घेतलेल्या एका सत्संगाची आठवण काढतात. पूर्वी त्यांनी गुरुदेवांना पाठवलेल्या लाडूंविषयी त्यांना आठवते. त्या गुरुदेवांना आवडणारे रामफळ रामनाथी (गोवा) येथे पाठवतात.

८ आ. वयोवृद्ध असूनही ब्रह्मोत्सवासाठी बसने प्रवास करणे : मामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी बसने आमच्या समवेत गोव्याला आल्या. उतारवयातही त्यांना प्रवास, उष्णता इत्यादींचा त्रास झाला नाही. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जवळून पहाता आले. मामींमध्ये गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव असल्याने हे शक्य झाले.

गुरुदेवांनी मला आदर्श साधकांच्या सहवासात ठेवून शिकण्याची संधी दिली. त्याबद्दल मी संत आणि गुरु यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. तारा शेट्टी, उत्तर कन्नड जिल्हा. (१५.५.२०२४)