Stock Market Crash : शेअर बाजार मोठ्या प्रमणात कोसळेल  ! – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ

शेअर बाजारचा फुगवटा लवकरच फुटण्याचा अंदाज व्यक्त

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी डेंट

वॉशिंग्टन – भविष्यात शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळणार असून तो वर्ष २००८ मधील मंदीच्या काळात होता, त्यापेक्षाही घसरेल, अशी चेतावणी प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी डेंट यांनी दिली. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत डेंट म्हणाले की, ही वादळापूर्वीची शांतता आहे; कारण मे महिन्याचा शेअर बाजार नफ्यासह  संपला. शेअर बाजारचा फुगवटा अद्याप फुटलेला नाही आणि जेव्हा तो फुटेल, तेव्हा तो संपूर्णपणे कोसळेल.

डेंट हे ‘एच्.एस्. डेंट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट’चे संस्थापक आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेविषयी अनेक वेळा स्पष्टपणे मत मांडले आहे. ‘नीविडिया’सारख्या अव्वल कामगिरी करणार्‍या समभागाच्या नफ्याविषयी बोलतांना डेंट म्हणाले की, परिस्थिती अधिक काळ अशीच रहाणार नाही. एक वेळ अशी येईल की, शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळेल.