Dumka Murder Case : १७ वर्षांच्या अंकिताला जिवंत जाळणार्‍या शाहरूख आणि नईम यांना जन्मठेपेची शिक्षा

आरोपी नईम (डावीकडे) आणि शाहरूख (उजवीकडे)

दुमका (झारखंड) – येथे २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी १७ वर्षांच्या अंकिता या हिंदु तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळणार्‍या शाहरूख आणि नईम यांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप अन् २५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. शेजारी रहाणारा शाहरूख अंकिताला प्रतिदिन मैत्री करण्यासाठी विचारायचा; मात्र अंकिताने त्याला नकार दिला होता.

या प्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे प्रमुख प्रियांक कानूनगो म्हणाले की, बांगलादेशातील कट्टरपंथी इस्लामी संघटनांनी या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांतून मोहीम चालवली होती. आम्ही या प्रकरणाच्या केलेल्या चौकशीच्या अहवालात गुन्हेगार बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय व्यक्त केला होता. दुर्दैवाने राज्य सरकारने या प्रकरणाचा योग्य तपास केला नाही किंवा न्यायालयालाही याची माहिती दिली नाही. सरकारने राजधर्माचे पालन करतांना त्यांच्याविरुद्ध फाशीच्या शिक्षेसाठी उच्च न्यायालयात दाद मागावी.

संपादकीय भूमिका

अशांना फाशीचीच शिक्षा करणे योग्य होते, असेच जनतेला वाटते !