ठाकरे गटाचे राजन साळवी यांची उच्च न्यायालयात याचिका

डॉ. राजन साळवी

मुंबई – ठाकरे गटाचे राजन साळवी बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी साळवी, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पत्नी आणि मुलगा यांच्यावरील गुन्हे रहित होण्यासाठी किंवा त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी ते उच्च न्यायालयात गेले आहेत. या प्रकरणी १२ फेब्रुवारीला एकलपिठासमोर सुनावणी होईल. १४ वर्षांत ३ कोटी ५३ लाख रुपये बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवी कुटुंबियांवर आहे. त्यांची मूळ संपत्ती २ कोटी ९२ लाख रुपये आहे.