नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – अन्य शासकीय पदांच्या भरतीमध्ये चक्रीपद्धतीने आरक्षण आहे. पोलीस भरती मात्र वांशिकपद्धतीने केली जात आहे. पोलीस पाटील असलेल्या व्यक्तीच्या पुढील पिढीतच या पदाची नियुक्ती होते. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेतही चक्रीपद्धतीने आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्याचा शासन विचार करत आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. १९ डिसेंबर या दिवशी एका लक्षवेधी सूचनेच्या वेळी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग व्यक्तींना पोलीस पाटीलपदी नियुक्त करण्याची मागणी केली. यावर विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.