अन्न आणि औषध प्रशासनाचा आदेश !
मुंबई – राज्यातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते बाहेरील राज्यांतून मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करतात. त्यामुळे राज्यात बनावट औषधांची आवक आणि विक्री होऊ शकते. याची नोंद घेत अन्न व औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) आपल्या सर्व विभागीय सह आयुक्त, साहाय्यक आयुक्त अन् औषध निरीक्षकांना बाहेरील राज्यातून येणार्या किरकोळ आणि घाऊक औषधांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. याविषयीचे परिपत्रकही काढण्यात आले आहे.