|

नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वर्ष २०२७ मध्ये ‘सिंहस्थ कुंभमेळा’ होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका यांच्याकडून ६ सहस्र ९०० कोटी रुपयांचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. या कुंभमेळ्यात ५ लाख साधू-महंत, तसेच ५ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. यांतर्गत प्रत्येक पर्वणीला ८० लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
१. आराखड्यामध्ये ९ उड्डाणपूल, तीन जलकुंभ, एक मोठे रुग्णालय, ३५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते, ५ सहस्र दिशादर्शक कमानी, ६० किलोमीटर बॅरिकेडिंग, ए.टी.एम्., दूध व्यवस्था, बस वाहतूक व्यवस्था, ५ सहस्र सीसीटीव्ही कॅमेरे, २ सहस्र पथदीप, १५ सहस्र फिरती शौचालये यांचे नियोजन करण्यात आले आहेे.
२. नाशिक शहरातील पंचवटी येथील साधूग्रामसाठी ५०० एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. तेथे ३ सहस्र प्लॉटचे नियोजन करण्यात आले आहे. यात ३ प्रमुख आखाडे आहेत, तर ५ लाख साधूंची रहाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
३. शहरात अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ५ सहस्र सीसीटीव्ही लावण्यात येतील. लाखो भाविकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

४. पंचवटी परिसरातील सीतागुफा, काळाराम मंदिर, रामकुंड या परिसराला प्राचीन पंचवटीचे स्वरूप देण्यात येणार आहे. रस्ते आणि घरे यांचे नूतनीकरण करण्यात येईल.
५. कुंभस्नान होणार्या रामकुंड आणि लक्ष्मीकुंड यांच्या मध्यभागी सतत जलप्रवाही भव्य गोमुख सिद्ध करण्यात येणार आहे. श्री काळाराम मंदिरासमोरील जागेत प्रभु श्रीरामाच्या जीवनावर आधारित देखावे उभारण्यात येणार आहेत. रामकुंडात प्रभु श्रीरामाचे बाण मारतांनाचे शिल्प, गांधी तलावावर लेझर शो, रामकुंडातील पाणी स्वच्छतेसाठी फिल्टर, तसेच अस्थीसमवेत राख विसर्जनासाठी स्वतंत्र कुंड असेल.
६. पौराणिक सीता गुफा, काळाराम मंदिर, रामकुंड परिसर कॉरिडॉर सिद्ध केला जाईल. यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे.
७. नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा चौपदरी मार्ग सहापदरी करण्यात येईल.
८. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अतिरिक्त कुमकसह अनुमाने २५ सहस्र पोलिसांचा फौजफाटा लागण्याची शक्यता आहे.
९. बाँब शोधक-नाशक पथकाला १० कोटी रुपये उपकरणे खरेदीसाठी आवश्यक आहेत. ड्रोन कॅमेर्यांसाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
१०. भाविकांची गर्दी लक्षात घेता शहरात निरीक्षणासाठी १०० ठिकाणी मनोरे उभारण्यात येतील. यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ