रामबन (जम्मू-काश्मीर) – जिल्ह्यातील राजगढ भागात लियाकत अली नावाच्या एका मुसलमान कुटुंबाच्या घरात हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत.
१. येथील दुर्गम गावात रहाणार्या लियाकत अली यांना २ महिन्यात ५ वेळा साप चावला. अली यांना येणार्या समस्या पाहून त्यांनी त्या ठिकाणच्या एका पीराला (आध्यात्मिक उन्नत व्यक्तीला दिली जाणारी उपाधी) बोलावले. या पीराने सांगितले, ‘तुमच्या घरात काहीतरी दडले आहे, ते खोदा.’ लियाकत अलीने घरात खोदकाम केल्यावर काही फूटावर त्याला माता वैष्णोदेवीची मूर्ती, शिवलिंग आणि गौतम बुद्ध यांच्या मूर्ती सापडल्या.
२. लियाकत यांनी स्थानिक लोकांना सांगितले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले; कारण या भागात सर्वाधिक लोकसंख्या मुसलमानांची आहे. सध्या येथे पूजा चालू झाली आहे.
३. शासनाशी बोलल्यानंतर याठिकाणी सुरक्षेसाठी ग्रामरक्षक दलाचे सदस्य तैनात करण्यात आल्याचे समोर आले असून या मूर्ती किती जुन्या आहेत, याचीही माहिती घेतली जात आहे.
४. प्रशासनाने याठिकाणी लक्ष घालून माता वैष्णोदेवी दरबाराच्या धर्तीवर भव्य मंदिर बांधावे, यासमवेत दर्शनासाठी इच्छिणार्या भाविकांना ये-जा करता यावी, यासाठी येथे रस्ते आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्थानिक हिंदु नागरिकांनी सांगितले.
संपादकीय भूमिकामशिदीमध्ये खोदकाम केल्यावरच नाही, तर आता मुसलमानांच्या घरांमध्ये खोदकाम केल्यावर हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडत आहेत, यावर आता याला विरोध करणारे काय बोलणार ? |