माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आम्ही जन्मोजन्मी विसरू शकत नाही ! – सौरभ कर्डे, शिवचरित्र व्याख्याते

श्री. सौरभ कर्डे

लांजा – कौटुंबिक आघात होत असतांना माँसाहेब जिजाऊ कधीच डगमगल्या नाहीत. अशाही परिस्थितीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी प्रेरणा दिली. श्री भगवतीदेवीचा आशीर्वाद आणि प्रबळ राष्ट्रभक्ती यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढच्या कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आम्ही जन्मोजन्मी विसरू शकत नाही, असे उद्गार राष्ट्रीय युवा शाहीर, शिवचरित्र व्याख्याते श्री. सौरभ कर्डे यांनी मांडले. येथील श्री देवी भगवती नवरात्र उत्सव मंडळात १८ ऑक्टोबरला ‘मातृशक्तीचा जागर आणि छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.

श्री भगवतीदेवी नवरात्री उत्सव मंडळ यांच्या वतीने श्री. सौरभ कर्डे यांचा सत्कार

श्री. सौरभ कर्डे पुढे म्हणाले की, यवनांचे सैन्य हिंदूंच्या घराघरांत शिरून स्त्रियांना पळवून नेत होते, त्यांची विटंबना करत होते. हे सगळे बघितल्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी नवरात्र बसवली. माँसाहेब जिजाऊंनी देवीजवळ प्रार्थना केली. माझ्या रयतेचे रक्षण कर. त्यासाठी त्यांनी देवीला साकडंही घातले आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

व्याख्यानापूर्वी येथील बजरंग दल, तांबट समाज, श्री भगवतीदेवी नवरात्री उत्सव मंडळ यांच्या वतीने श्री. सौरभ कर्डे यांचा सत्कार करण्यात आला, तसेच ‘सकल हिंदु समाज’लांजाच्या वतीने श्री. सौरभ कर्डे यांना ‘लव्ह जिहाद‘, ‘हलाल जिहाद’ आणि नुकतेच प्रकाशित झालेले डॉ. अमित थढानी यांचे पुस्तक भेट देण्यात आले.